इंदापूरमध्ये पाणी परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:20+5:302021-09-11T04:11:20+5:30

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास भूजल सर्वेक्षण संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कृषी मूल्य आयोगाचे सचिव ...

Organizing water conference in Indapur | इंदापूरमध्ये पाणी परिषदेचे आयोजन

इंदापूरमध्ये पाणी परिषदेचे आयोजन

googlenewsNext

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास भूजल सर्वेक्षण संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कृषी मूल्य आयोगाचे सचिव उदय देवळाणकर, उपविभागीय अधिकारी कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजय परिट उपस्थित राहणार आहेत. पाण्याचा मुद्दा हा ग्लोबल स्तरावर चिघळत चालला आहे. पाण्याच्या स्रोतावर अतिक्रमण वाढले आहे माती, पाणी आणि पर्यावरणाचे विभाजन झाल्यामुळे आपत्तीची स्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी पाणी चळवळीची गरज उभी राहिली पाहिजे असे पवार यांनी नमूद केले.

बुधवारी सकाळी मान्यवर कडबनवाडी पाणलोट क्षेत्रात भेट देणार आहेत. त्यानंतर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी पाणी, जमीन, पर्यावरण याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. जलदूत व जलसेवक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे दोन सत्रात होणाऱ्या परिसंवादातून पाणी या विषयावर व्यापक चर्चा होणार आहे राजस्थानमध्ये पाणी बळकटीकरण करण्यासाठी राजेंद्रसिंह राणा यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणी प्रश्न व उजनी जलाशय प्रदूषण यावर उहापोह होणार आहे अशी माहिती पवार यांनी दिली.

Web Title: Organizing water conference in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.