मुळशीतून रिंगरोडला विरोध ; ६५०हरकती अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:32+5:302021-02-06T04:19:32+5:30
-- घोटवडे : मुळशी, खेड, हवेली, भोर, मावळ ,वेल्हा अशी तालुक्यातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी प्रशासनाने जमीन संपादन करण्यासाठी ...
--
घोटवडे : मुळशी, खेड, हवेली, भोर, मावळ ,वेल्हा अशी तालुक्यातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी प्रशासनाने जमीन संपादन करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याचा नुकताच पावित्रा घेतला तोपर्यंतच मावळ तालुक्यातील साडेतीनशे शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या जमिनी ने देण्याचा निर्णय घेतला. रिंगरोडबाबत राजपत्र प्रसिध्द होताच तातडीने सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी त्याला विरोध करण्यासाठी स्वतंत्र हरकती अर्ज दाखल केला. त्याबाबत रस्ते विकास महामंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणाहून जाणाऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे.
केळवडे, खेड, शिवापूर ते उरसे या भागातून रिंग रोड जाणार आहे. त्यासाठीचे महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवारी प्रकाशित झाले. त्यामध्ये ज्या गावातून रिंग रोड जाणार त्यांची नावे ज्या जमिनी अधिगृहित कराव्या लागणार त्याचा गट व सर्व्हे नंबर प्रकाशित करण्यात आला आहे. याबाबत हरकती अर्ज मागविण्यासाठी काही तारखांची मुदतही दिली आहे. मात्र हरकती अर्ज स्विकारण्याच्या तारखेच्या आधीच जाहिरात प्रसिध्द होताच तब्बल सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जणून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रमाणे जमावाने आले याबाबत त्यांनी प्रांत कार्यालयाने त्यांना रस्ते विकास महामंडळाच्या कार्यलायत पाठवले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळविला. तेथली अधिकारी यांना कोर्ट स्टॅम्प लाऊन अधिकृतपणे हरकती अर्ज दाखल केले.
--
शेतकऱ्यांच्या हरकतीचे मुद्दे असे
रिंग रोडमुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे मुख्य साधन असलेल्या शेतजिनी प्रकल्पात जातील व शेतकरी भूमीहीन होतील, हा रस्त्याच्या मार्गात येणारे ओढे, नाले बुजविले गेल्यास त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत अडवले जातील त्यामुळे जमिनींसह जंगल परिसरातील जलस्त्रोत आटेल व जनावरांना पिण्यास पाणी मिळणार नाही, रस्त्यामूुळे एकूणच पर्यावरणाला हानी पोचेल, शेतजमिनी या प्रकल्पात गेल्यास अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल. याशिवाय या प्रकलाप्बाबत आतापर्यंत तीन वेळा संपादित होणाऱ्या जनिमीच्या नकाशांंमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे कोणत्या जमिनी संपादित करणार याबाबत स्पष्ट धोरण दिसत नाही.
यावेळी घोटवडे, रिहे ,जवळ, पिपळोली ,अंबडवेट व परिसरातील माणिकराव शिंदे, साहेबराव भेगडे ,पांडुरंग मतरे अनंता घारे ,कुंडलिक मातेरे ,अविनाश शिंदे, अविनाश खणेकर ,लक्ष्मण कानगुडे ,गणेश केसवड , सुनील कडू ,संजय घारे ,रोहिदास लांडगे ,संतोष घारे ,मंगेश शिंदे, विलास शिंदे, सुनील शिंदे बबन शिंदे, राजू शेळके ,कमलाकर शिंदे, योगेश शेळके ,रमेश ढमाले, व प्रकल्पग्रस्त शेतकरी हजर होते अशी माहिती माणिकराव शिंदे व योगेश शेळके यांनी दिली.
--
कोट
रस्ता तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीलमालाची वाहतूक करणे अधिक सोयीचे व कमीत कमी वेळेत बाजारपेठेत पाठवता येणार आहे, रस्त्यासाठी कमीतकमी बागायत क्षेत्र संपादित व्हावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. रस्ता तयार करताना जिथे ओढे नाले आहेत तिथे पूल, मोरी, आणि पाईपलाईन करण्यात येणार असल्याने जलस्त्रोत अडविला जाणार नाही त्यामुळे पर्यावरणाची, प्राण्यांची हाणी होणार नाही.
- चौरे
रस्ते विकास महामंडळ,