कालिदासांच्या ‘मेघदूता’वर अश्लीलतेचा अनाठायी ओरखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:04+5:302021-09-02T04:20:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कालिदासांच्या मेघदूत या साहित्यकृतीवर अश्लीलतेचा अनाठायी ओरखडा उमटवला जातो. पण या साहित्यकृतीतील शृंगारिक वर्णने ...

An orphaned scratch on Kalidasa's 'Meghdoota' | कालिदासांच्या ‘मेघदूता’वर अश्लीलतेचा अनाठायी ओरखडा

कालिदासांच्या ‘मेघदूता’वर अश्लीलतेचा अनाठायी ओरखडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कालिदासांच्या मेघदूत या साहित्यकृतीवर अश्लीलतेचा अनाठायी ओरखडा उमटवला जातो. पण या साहित्यकृतीतील शृंगारिक वर्णने ही अश्लील नसून उत्कट आहेत. अलीकडचा समाज भलत्याच विषयाची लाज बाळगतो आणि नको त्या विषयात कोडगेपणा दाखवतो. कालिदासांच्या मेघदूतावरून मानवी प्रतिभेची ताकद अफाट असल्याचे अधोरेखित होते. कारण कालिदासांच्या ‘मेघदूता’त समग्र जीवनाचे दर्शन घडते,” असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.

आम्ही नूमविय ६२ तर्फे आयोजित विश्वनाथ राजपाठक लिखित आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘रे सावळ्या घना’ या कादंबरीचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. मंजिरी धामणकर, लेखक राजपाठक, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर, आम्ही ‘नूमविय’चे अध्यक्ष डॉ. गोविंद मराठे, आनंद नवाथे आदी उपस्थित होते.

गोडबोले म्हणाल्या, “सुमारे पंधराशे ते सोळाशे वर्षांपूर्वी कालिदासांनी निर्माण केलेले साहित्य आजही साहित्यिक, कवी आणि कलावंतांच्या प्रतिभेला आवाहन देते. कवयित्री शांता शेळके, सी. डी. देशमुख, कुसुमाग्रज यांच्यासारखे अनेक प्रतिभावान साहित्यिक कालिदासांच्या ‘मेघदूत’ या साहित्यकृतीवर त्यांच्या नजरेतून अभिव्यक्त झाले आहेत. कालिदास आणि त्यांच्या साहित्यकृतींच्या अस्तित्वाविषयी आजही अनेक सिद्धांत मांडले जातात. ‘मेघदूता’ हे मंदाक्रांता या वृत्तात लिहिलले एकशे दहा कडव्यांच्या श्लोकांचे खंडकाव्य आहे.”

मंजिरी धामणकर म्हणाल्या, मूळ मेघदूत हे संस्कृतप्रचुर असल्याने ते आजच्या पिढीला त्याचा आस्वाद त्यांना घेता येत नाही. मेघदूतातील वर्णन केेलेला श्रृंगार हा केवळ शारीरिक संबंध या उच्छृंखल व्याख्येभोवती गुंफलेला नसून श्रृंगाराला कला आणि रतिक्रीडेचा दर्जा दिलेला आहे. शरीरसुखाच्या पलीकडचा श्रृंगार यात मांडलेला आहे. आप्त तृप्ती आणि आत्म तृप्ती सुंदर मिलाफ या काव्यात आहे. कारण हा शृंगार पंचेंद्रियांपलीकडे जाणारा आहे. राजपाठक आणि देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद नवाथे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: An orphaned scratch on Kalidasa's 'Meghdoota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.