आरटीईची दुसरी सोडत शनिवारी होणार, शिक्षण विभागाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:18 AM2018-04-20T03:18:31+5:302018-04-20T03:18:31+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आरक्षित जागांच्या प्रवेशासाठीची दुसरी सोडत शनिवारी (दि. २१) काढली जाणार आहे. दुपारी एक वाजता आॅनलाइन सोडत काढल्यानंतर, प्रवेशासाठी निवड झाल्याचे संदेश पालकांना मोबाईलवर पाठविले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आरक्षित जागांच्या प्रवेशासाठीची दुसरी सोडत शनिवारी (दि. २१) काढली जाणार आहे. दुपारी एक वाजता आॅनलाइन सोडत काढल्यानंतर, प्रवेशासाठी निवड झाल्याचे संदेश पालकांना मोबाईलवर पाठविले जाणार असल्याची
माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षण विभागाकडून सुरूवातीला जाहीर करण्यात आलेले ‘आरटीई’चे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. तांत्रिक कारणांमुळे पहिली सोडतही वेळेत काढता आली नाही. त्यानंतर प्रवेशासाठीही सातत्याने मुदतवाढ द्यावी लागली. त्यामुळे
दुसरी सोडत काढण्यासही विलंब झाला आहे.
ही सोडत बुधवारी (दि. १८) काढण्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे सोडत काढता आली नाही. आता ही सोडत शनिवारी काढण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पहिल्या फेरीत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत संधी मिळणार आहे. त्यामुळे पाल्यांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.
मोबाईलवर संदेश
पुणे जिल्ह्यात पहिल्या फेरीत निवड झालेल्या १० हजारपैकी ६ हजार ८०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. निवड होऊन प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दुसºया सोडतीमध्ये विचार केला जाणार नाही; तसेच न्यायालयात गेलेल्या शाळांमध्येही प्रवेश दिले गेलेले नाहीत. इतर शाळांसाठी दुसरी सोडत काढली जाईल. शनिवारी दुपारी एक वाजता आॅनलाइन सोडत काढल्यानंतर निवड झाल्याचे संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविले जातील. त्यानुसार शाळांना मुदतीत प्रवेश निश्चित करावा लागेल.