इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 06:20 PM2018-10-22T18:20:22+5:302018-10-22T18:31:30+5:30

या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही

Like other schemes, Jalyukt Shivar scheme is also failed : Supriya Sule | इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

Next

पुणे : सध्याच्या सरकारला योजना राबवण्यापेक्षा जाहिरातीची घाई आहे. त्यामुळे त्यांनी जलयुक्त शिवार योजनेचाही अभ्यास केलेला नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले आहे.इतर योजनांप्रमाणेचं सरकारने जलयुक्त शिवारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीकाही त्यांनी केली.
                      पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या की, या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळ न घालवता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला आहे.महाराष्ट्र सरकारनेही फार वेळ न घालवता दुष्काळ जाहीर करायला हवा.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,

  • पुण्यातील हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू
  • स्थानिकांना त्रास होत असल्याचे मान्य, मात्र एकेरी वाहतुकीमुळे बदल घडण्यास सुरवात
  •   या सरकारसारखी आरोप करण्याची माझी स्टाईल नाही
  • फटाक्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या न्यायालयीन याचिकेला धार्मिक रंग देण्यात येऊ नये
  • अमृता फडणवीस यांच्या सेल्फी प्रकरणी त्यांचे वैयक्तिक आयुष्य असल्याचे सांगत बोलण्यास नकार

Web Title: Like other schemes, Jalyukt Shivar scheme is also failed : Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.