भुयारी मार्ग जोडणार अन्य वाहतूक सुविधांना, आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार करणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 04:27 AM2017-12-24T04:27:45+5:302017-12-24T04:27:54+5:30

शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग त्यावरील अन्य वाहतूक सुविधांना जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांची मदत घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्येही पुणे शहराचे वैशिष्ट्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहेत.

Other transport facilities that will connect the subways, the international architectural work will be done | भुयारी मार्ग जोडणार अन्य वाहतूक सुविधांना, आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार करणार काम

भुयारी मार्ग जोडणार अन्य वाहतूक सुविधांना, आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार करणार काम

Next

पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग त्यावरील अन्य वाहतूक सुविधांना जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो कंपनीच्या वतीने केला जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकारांची मदत घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्थानकांमध्येही पुणे शहराचे वैशिष्ट्य आणण्यासाठी विशेष प्रयत्न केला जात आहेत.
महामेट्रोच्या वतीने ही माहिती देण्यात आली. शिवाजीनगर ते स्वारगेट हा सुमारे ५ किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग पूर्ण भूयारी आहे. जमिनीच्या तब्बल २५ मीटर खालून तो जाणार आहे. धावणाºया मेट्रोच्या वर किमान ६ मीटर अंतर असणार आहे. या भुयारी मार्गात ५ स्थानके असतील. तिथून प्रवाशांना वर येता यावे, आल्यानंतर लगेचच रस्त्यावरची वाहने उपलब्ध व्हावीत, त्यासाठी लांब अंतरावर चालत जावे लागू नये यासाठी महामेट्रो विशेष प्रयत्न करत आहे.
यामध्ये शिवाजीनगर येथे रस्त्यावरून धावणाºया एसटी शहरातंर्गत धावणाºया पीएमपी, रेल्वे मार्ग, पीएमपीआरडीचा मेट्रो
मार्ग एकमेकांना जोडणार
आहे. न्यायालय परिसरातील रस्त्यावरच्या वाहन सुुविधाही अशाच मेट्रो मार्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली.
भुयारी मार्ग शहराच्या मध्यवस्तीतून जाणार असला तरीही तो जमिनीच्या किमान २८ मीटर खाली असेल. अत्याधुनिक यंत्रांच्या साह्याने हा बोगदा तयार केला जाणार
आहे. त्यामुळे त्याच्या आसपासच्या वास्तू किंवा जमिनीतील जलवाहिन्या, विजेच्या किंवा दूरसंचारच्या
तारा यांना काहीही धोका नाही, असे सांगण्यात आले.

उन्नत मार्गावरची सर्व स्थानके विशिष्ट आकारची

मेट्रोबद्दल प्रवाशांना लांबूनही आकर्षण वाटले पाहिजे. त्यासाठी उन्नत मार्गावरची (रस्त्यावरच्या) सर्व स्थानके विशिष्ट आकार देऊनच बांधण्यात येतील. त्यासाठीही विशेष वास्तुरचनाकार प्रयत्न करीत आहेत. यात पगडी किंवा पुणे शहराची ओळख असलेले अन्य आकार कसे करता येतील याचा विचार होत आहे.

काही आरेखने तयार असून ती तंत्रदृष्ट्या तपासून पाहण्यात येत आहेत. प्रवाशांना कसलाही त्रास होऊ नये, अशीच मेट्रोची व स्थानकांची रचना असणार आहे. सुलभ व सोप्या पद्धतीने मेट्रोकडे जाता यावे, तिथून येता यावे यासाठी खास प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी
माहिती महामेट्रोने दिली.

Web Title: Other transport facilities that will connect the subways, the international architectural work will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो