...अन्यथा रस्त्यावरच भाजीविक्री करू
By admin | Published: December 29, 2014 12:43 AM2014-12-29T00:43:35+5:302014-12-29T00:43:35+5:30
भोर शहरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांविरोधात मंडईतील भाजीव्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई
भोर : भोर शहरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांविरोधात मंडईतील भाजीव्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांच्या विरोधात रस्त्यावरच दुकाने थाटण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भोर शहरातील रस्त्यावर अनाधिकृतपणे भाजी विक्री करणा-यांमुळे भाजी मंडईत अधिकृतपणे भाजी विक्री करणा-या दुकानदारांचा व्यावसाय होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भोर शहरात भाजी विक्रेत्यांसाठी सुमारे २५ वर्षापुर्वी भाजी मंडई उभारण्यात आली होती. मात्र सध्या ही इमारत गळत असुन धोकादायक बनली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांनी मंडईच्या बाहेर तातपुरत्या स्वरुपात ताडपत्रीच्या साहयाने स्टॉल उभारले आहेत. मंडईला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा अधिक वावर असतो. सर्वत्र कच-याचे ढिग,गवत केरकचरा पडलेला असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली असते. या ठिकाणी डांबरीकरण नाही तसेच वीजेचीही सोय नाही. यामुळे रात्री अपरात्री जनावरे भाजी पाला खातात. अनेकदा चो-या ही होतात. अशा वातावरणात व्यावसायिकांना भाजी पाला विकावा लागतो.
दरम्यान, भोर शहरात सुमारे २२ ते २५ भाजी विक्रेते महात्मा फुले भाजी मंडईत अधिकृतपणे भाजीपाला विक्री करूण आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, मगिल दोन ते तीन वर्षांपासुन भोर शहरातील नगरपलिका चौक ते एस टी स्टॉड व नीरा नदीच्या पुलाच्या पलिकडे भोलावडे गावाच्या हद्दीत भर रस्त्यात बसुन अनाधिकृतपणे भाजी विक्री करणा-यांची संख्या वाढली आहे. यामुळे भोर शहरासह ग्रामीण भागातुन येणारे ग्राहकांना ते जवळ पडत असल्याने रस्त्यातच भाजी खरेदी करतात आणी पुन्हा एस. टी.स्टॅडवर जातात. यामुळे भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहक येत नसल्याने अधिकृतपणे भाजी विक्री करणा-या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेकांनी आपला यावसायही बंद केला आहे.
भोर नगरपलिकेला याबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यांनी दुर्लक्ष होत असल्याने नगरपलिकेकडुन पावत्या फाडणा-या ठेकेदाराकडुन या अनाधिकृत भाजी विक्र्रत्यांकडुन जादा पैसे घेऊन त्यांना अभय देत असल्याची चर्चा आहे. यामुळे महात्मा फुले भाजी मंडईतील अधिकृत भाजी विक्री करणारे दुकानदार त्रस्त झाले आहेत. भाजी विक्रीच होत नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्त्यावरील अनाधिकृत भाजीपाला विक्रेते बंद करा अन्यथा रस्त्यावर दुकाने मांडून भाजी विक्री करु असा इशारा विक्रत्यांनी दिला आहे.