पुराेगामी विचारांच्या पक्षांसाठी अामचे दरवाजे माेकळे : अॅड प्रकाश अांबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:42 PM2018-06-20T12:42:47+5:302018-06-20T13:11:18+5:30

पुराेगामी विचारांच्या पक्षांसासाठी अामचे दरवाजे माेकळे असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड प्रकाश अांबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

our doors are open for progressive idealogical partys says prakash ambedkar | पुराेगामी विचारांच्या पक्षांसाठी अामचे दरवाजे माेकळे : अॅड प्रकाश अांबेडकर

पुराेगामी विचारांच्या पक्षांसाठी अामचे दरवाजे माेकळे : अॅड प्रकाश अांबेडकर

Next

पुणे :  पुराेगामी विचारांच्या पक्षांसाठी अामचे दरवाजे माेकळे अाहेत. अामच्या अटी मान्य असणाऱ्या पक्षासाेबत अाम्ही जाऊ परंतु शरद पवार यांच्यासाेबत जाणार नसल्याचे अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी स्पष्ट केले. पुण्यात अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. शरद पवारांना प्रतिगामी मानत नाही मात्र त्यांनी बरीच प्रतिगामी पाऊले उचलली अाहेत. पेशवाईला अामचा विराेध अाहेच, त्यामुळे पवारांनी फुले पगडी स्वीकारली याचा अानंद असल्याचेही अांबेडकर यावेळी म्हणाले. 


    बहुजन अाघाडी या बॅनरखाली 48 मतदारसंघात लाेकसभेची निवडणूक लढवून वंचित समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी त्यांना उमेदवारी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अांबेडकर म्हणाले, काश्मीरसारखे महाराष्ट्र सरकार सुद्धा पडण्याची चिन्हे अाहेत. जुलै महिन्याच्या नागपूर येथील अधिवेशनाला शिवसेनेचा विराध अाहे. या अधिवेशनावर शिवसेनेने बहिष्कार टाकला तर महाराष्ट्र सरकारही पडेल. त्याचबराेबर शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी परिषद अायाेजित करण्यात येणार असून चाॅईस अाॅफ एज्युकेशनच्या दृष्टीने प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार अाहेत. विभक्तपणाचा फायदा येथील वेगवेगळे घटक घेत अाहेत हे थांबविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार असून संविधान सर्वांपर्यंत पाेहचविणार असल्याचे अांबेडकरांनी स्पष्ट केले. 

   त्याचबराेबर पोलिसांनी आपला गाढवपणा व्यक्त केला आहे. रवींद्र कदम यांनी नियम पायदळी तुडवले. देशभरातील राजकारणी मंडळींना मीच एकत्र आणू शकतो हे भाजपला माहीत असल्याने माझ्यावर कारवाई केली जात आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. माझ्याविरोधात पुरावा नसल्याने आता पंतप्रधानांना मारणाऱ्यांच्या यादीत माझं नाव टाकलं आहे. पी.बी.सावंत, कोळसे पाटील हे माजी न्यायमूर्ती असल्याने पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत मी सामान्य असल्याने माझ्याविरोधात कारवाई होत आहे. पोलिसांनी चौकशीला बोलावले तर पोलिसांना मी नोटीस पाठवीन आणि माझा वकिली हिसका रविंद्र कदम यांना आणि पोलिसांना दाखवेन असेही ते यावेळी म्हणाले. 

Web Title: our doors are open for progressive idealogical partys says prakash ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.