आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 04:25 PM2024-11-11T16:25:17+5:302024-11-11T16:25:27+5:30

लाडकी बहीण योजनेतून वर्षाला १८ हजार, किसान सन्मान योजना १५ हजार वर्षाला मिळणार

Our government is back as we keep our promises Muralidhar Mohol | आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ

आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ

पुणे : भाजपच्या पाच वर्षांच्या संकल्पपत्रात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, सामाजिक जिवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. संकल्पपत्र तयार करताना ८७७ गावांमधून ८ हजार ५३७ सूचनांचा विचार केलेला आहे. आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले आहे. लाडकी बहीण योजनेतून वर्षाला १८ हजार, किसान सन्मान योजना १५ हजार वर्षाला मिळणार आहेत, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी भाजपचे संदीप खर्डकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, अमोल कविटकर उपस्थित होते. 

मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली १० वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीरनाम्यातील ३७० कलम, तिहेरी तलाक, राम मंदिर उभारणी केली आहे. मुंबईत कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग केला आहे. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने शेतकरी, महिला, तरुणांना स्वावलंबी केले आहे. विकासाच्या दिशेने वेगाने महाराष्ट्र पुढे जात आहे. आगामी पाच वर्षांचे संकल्पपत्रात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षणक्षेत्र, सामाजिक जीवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. भाजपने ८७७ गावांमधून आलेल्या ८ हजार ५३७ सूचनांचा विचार करून संकल्पपत्र तयार केला आहे. लाडकी बहीण योजनेतून वर्षाला २१ हजार, किसान सन्मान योजना १५ हजार वर्षाला मिळणार आहेत. शेतकऱ्यांना मोफत पीकविमा योजनेबरोबर मोफत वीजबिल केले आहे. भाजपने सामन्य जनतेचा विचार केला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

ते सरकार महर्षी असतील; पण मी शेतकऱ्याचा मुलगा

रितेश देशमुख यांच्या साखर कारखान्याला १ हजार कोटी रुपये दिले आहेत. देशमुख यांना याची माहिती त्यांना नसेल म्हणून बोलले असावेत. मी सहकारात नवीन आहे. ते सरकार महर्षी असतील; पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे सहकार काय आहे माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला मोदी सरकारच्या काळात ‘एनसीडीसी’ने १ हजार ४४२ कोटी रुपये दिले आहेत. हे मी बोललो. ते जयंत पाटील यांना लागले आहे, असे श्री. मोहोळ म्हणाले.

Web Title: Our government is back as we keep our promises Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.