आमची लाईन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:07+5:302021-08-21T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकांच्या बाबतीत आमचे धोरण ठरले आहे, प्रत्येक पक्षाची लाईन असते, आमची लाईन सर्वांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणुकांच्या बाबतीत आमचे धोरण ठरले आहे, प्रत्येक पक्षाची लाईन असते, आमची लाईन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. सरकारच महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा ते ठरवेल असे ते म्हणाले.
पटोले यांनी काँग्रेस भवनमध्ये शहरातील आठही विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक घेतली. शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पत्रकारांबरोबर बोलताना पटोले म्हणाले, राज ठाकरे अलंकारिक बोलतात. जातीपातीबाबत ते काय म्हणाले मला समजले नाही. काँग्रेस नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी निवडणूक लढवते. त्यामुळे जातीपातीचा किंवा संघटनेतील फेरबदलांचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. प्रभाग किती सदस्यांचा हे तीन पक्ष ठरवतील. आमची कसलीही तयारी आहे.
नाशिक मध्यवर्ती ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले, तिथे महापालिकेत भाजपची सत्ता आहे, इथे स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत सापडले, भाजपचीच सत्ता आहे, पुण्यात जागा विकतात इथेही भाजपच आहे. तिथे सगळेच फक्त भ्रष्टाचार करत आहेत. त्यांना जनता, त्यांचे प्रश्न याच्याशी काहीच करायचे नाही. त्यामुळे लोकच त्यांना बरोबर जागा दाखवतील असे पटोले म्हणाले.
शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पटोलेंचे स्वागत केले.
---------------
दाभोलकरांचे मारेकरी पकडा
अंनिसचे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अजून सापडत नाहीत हे काही योग्य नाही. भीमा कोरेगाव प्रकरणी त्यांनी सकाळी सरकार म्हणून शपथ घेतली व दुपारी तपास केंद्राकडे सोपवला. केंद्र सरकारी यंत्रणांचा राज्यातील हस्तक्षेप वाढतो आहे, अशी टीका करून पटोले यांनी दाभोलकरांचे मारेकरी त्वरित पकडावेत, त्यांना शिक्षा व्हावी हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे सांगितले.