लोकसहभागातून ‘आमचा गाव आमचा विकास’

By Admin | Published: August 12, 2016 12:57 AM2016-08-12T00:57:56+5:302016-08-12T00:57:56+5:30

केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून

'Our village is our development' | लोकसहभागातून ‘आमचा गाव आमचा विकास’

लोकसहभागातून ‘आमचा गाव आमचा विकास’

googlenewsNext

गावाचा नेमका कसा विकास साधणार?
केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून, तीन ते पाच टप्प्यांत विविध योजना राबविणार आहे़ त्यानुसार ग्रामसभेद्वारे घेतलेल्या विकासाच्या निर्णयाची अंमलबजावणी वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे़ या योजनेसाठी तालुका पातळीवरून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यामध्ये काम करणारे १० संपर्क अधिकारी आणि १० मास्टर अधिकारी अशी विभागणी केली जाणार आहे़ गावाच्या विकासाबाबत घेतलेले निर्णय संमतीने मान्य केले जाणार आहेत. गावचा विकास हाच उद्देश असल्यामुळे या योजनेचा फायदा तालुक्यातील गावांना
होणार आहे़ यामुळे गावासह नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे.
लोकसहभाग कसा घेतला?
तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकाने गावच्या विकासासाठी हातभार लावावा, यासाठी प्रयत्न होत आहेत.या योजनेची माहिती लोकांना देण्याकरिता प्रत्येकाला पत्र पाठविण्यात आले आहे़ मशाल फे री, लोकांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन जनजागृती करणार आहे़ मावळ तालुक्यात १८४ महसुली गावे आहेत, तर १०४ ग्रामपंचायती आहेत़ संपूर्ण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येत आहे़ विविध योजनांद्वारे लोक सहभाग वाढण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे़
योजनेतून निधीचे वाटप कसे?
केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या १४व्या वित्त आयोगाचा निधीतील २५ टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि इतर उपजीविका जगणारे नागरिक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे़ तर १० टक्के निधी महिला व बालकल्याण विभागाला राखीव ठेवला आहे़ १५ टक्के निधी समाजकल्याण विभागाला राखून ठेवला आहे़ आणि उर्वरित ५०
टक्के गावचा विकास हे धोरण या योजनेत आहे़
विकास आराखडा कसा असेल?
गावचा विकास साधता यावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेत गावचा आराखडा तयार करून विद्यार्थी, नागरिक, महिला, युवतींना मार्गदर्शन केले जाणार आहे़ नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी या योजनेत महिला, मुलींना सहभागी करून प्राधान्य देणार आहे़ तालुक्यातील पर्यटनवाढीला वाव आहे. निसर्गसंपन्न अशा गावांमध्ये पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल. विकासात स्वयंरोजगार निर्मितीलासुद्धा प्राधान्य दिले जाईल.
शब्दांकन : नवनाथ शिंदे

Web Title: 'Our village is our development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.