राज्यातल्या ९५७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:19+5:302021-07-17T04:09:19+5:30
पुणे : शाळांनी दिलेल्या अंतर्गत मूल्यमापन गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची ...
पुणे : शाळांनी दिलेल्या अंतर्गत मूल्यमापन गुणांच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे. गेल्या वर्षी २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. यंदा ९५७ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत. यात लातूर विभागातील सर्वाधिक २७८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ पद्धतीने निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळत आहेत. मात्र, यंदा शाळांकडून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आले. त्या आधारेच दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७१५ ने वाढली आहे.
चौकट
विभागीय मंडळनिहाय १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी
पुणे : ७९, नागपूर : २५, औरंगाबाद : २६१, मुंबई : ३२, कोल्हापूर : ९२, अमरावती : १०५, नाशिक : ६१, लातूर : २७८, कोकण : २४