जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी येडगाव आणि वडज धरणे १०० टक्के भरली;विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:43 PM2020-08-22T15:43:47+5:302020-08-22T15:44:23+5:30

कुकडी प्रकल्पामधील सर्व धरणे सरासरी ५९.५५ टक्के भरली आहेत..

Out of five dams in Junnar and Ambegaon talukas, Yedgaon and Wadaj dams are 100 per cent full | जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी येडगाव आणि वडज धरणे १०० टक्के भरली;विसर्ग सुरु

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी येडगाव आणि वडज धरणे १०० टक्के भरली;विसर्ग सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्यावर्षी आजमितीला सर्व धरणांमध्ये ९१.२२ टक्के पाणीसाठा झाला होता.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी येडगाव , वडज ही धरणे १०० टक्के भरली असून या धरणातून कालवा आणि नदीद्वारे विसर्ग सुरु करण्यात आला आहे . तर डिंभा धरण हे ८४ टक्के भरले आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.०१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली .
    दरम्यान, कुकडी प्रकल्पामधील सर्व धरणे सरासरी ५९.५५ टक्के भरली आहेत. गेल्यावर्षी आजमितीला सर्व धरणांमध्ये ९१.२२ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्यावर्षीची व आजची तुलना करता सर्व धरणे मिळून ३१.६७ टक्के पाणीसाठा कमी आहे . जूनपासून चांगल्या पावसाला सुरवात झाली मात्र धरणाच्या पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने माणिकडोह आणि पिंपळगाव जोगा ही धरणे अद्याप भरलेली नाहीत.
  .........

जुन्नर तालुक्यातील पाच धरणांचा उपयुक्त पाणीसाठा व टक्केवारी तसेच झालेल्या पाऊसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे: 

येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा १८६० द.ल.घ.फुट ( ९५.७१ टक्के ) असून या धरणातून कुकडी डावा कालव्यातून विसर्ग सुरु आहे , धरणाच्या  पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ७०२ मि.मी.पाऊस तर २४ तासात १७ मि. मी. पाऊस झालेला आहे.
माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ३४७८ द.ल.घ.फुट ( ३४.१७ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध आहे , पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ४९३ मि.मी.पाऊस झालेला आहे. असून २४ तासात २० मि.मी.पाऊस झालेला आहे .

वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा १०७४ द.ल.घ.फुट ( ९१.५५ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध आहे , या धरणातून मीना नदीत ७६४ तर मीना शाखा कालवा द्वारे २२० कुसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे . पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ३४३ मि.मी.पाऊस झालेला आहे. असून २४ तासात १ मि.मी.पाऊस झालेला आहे .
      पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणीसाठा ९२८ द.ल.घ.फुट ( २३.८५ टक्के ) पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ५३५ मि.मी.पाऊस झालेला आहे. असून २४ तासात ११ मि.मी.पाऊस झालेला आहे. आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात १०८११ द.ल.घ.फुट ( ८६.५२ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे . धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जून पासून आजअखेर ६८९ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासात ९ मि.मी.पाऊस झालेला आहे , अशी माहिती कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली .

Web Title: Out of five dams in Junnar and Ambegaon talukas, Yedgaon and Wadaj dams are 100 per cent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.