सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:56 AM2024-05-27T09:56:49+5:302024-05-27T09:57:18+5:30

''आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे'', या म्हणीप्रमाणे लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करणार

Out for snakebite awareness Reached the milestone of 1800 km on foot and directly reached Kedarnath | सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला

सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला; पायी १८०० किमीचा टप्पा गाठला अन् थेट केदारनाथला पोहोचला

दीपक जाधव

सुपे : सामाजिक कामाची आवड असलेला सुपे (ता. बारामती) येथील विलास वाघचौरे कधी सायकलवरून, कधी मोटारसायकलवरून तर कधी पायी भारतभर फिरून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे; पण आजही सर्वांच्या कुतूहल व भीतीचा विषय कायम मनात राहिला आहे. त्यामुळे साप चावल्यावर अनेकांना त्यावर उपचार काय करावयाचे, याबाबत माहिती नसते. पावसाळ्यात सापांचे बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सुपा भागासह देशभरात भ्रमंती करीत विलास वाघचौरे हा अवलिया सर्पदंश जनजागृतीसाठी बाहेर पडला अन् थेट केदारनाथमध्ये दर्शनाला पोहोचला. यादरम्यान त्याने चक्क पायी १८०० किलोमीटरचा टप्पा पार केला.

सुपे येथील या अवलियाने केदारनाथचा १८०० किलोमीटरचा प्रवास चक्क पायी केला आहे. त्यामुळे त्याने केलेल्या प्रवासाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. त्याने यापूर्वी सायकल, दुसऱ्या वर्षी दुचाकी आणि आताा चक्क पायी केदारनाथ प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याने नागरिकांना पर्यावरणविषयक तसेच विविध सापांविषयी सर्पदंशबाबत जनजागृती करण्याचे काम करीत आहे. विलास विठ्ठल वाघचौरे, असे या सर्पमित्र अवलियाचे नाव आहे. विलास याने २०२२ साली मोटारसायकलवर ५ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करत ‘पर्यावरण बचाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश देत केदारनाथचे अंतर पूर्ण केले होते. त्यानंतर सन २०२३ साली सायकलवर ५ हजार ६०० किलोमीटर अंतर देखील सामाजिक संदेश देत पूर्ण केले होते.

यावर्षी १८ फेब्रुवारी २०२४ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी बारामती भिगवण चौक गणेश मंदिरपासून प्रवासाला सुरुवात करून तब्बल १८०० किलोमीटरची पदयात्रा ९० दिवसांत केदारनाथला पोहोचून पूर्ण केली. तो गुरुवारी (दि. २३) सुप्यात परत आला. सुपे येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही जनमाणसात त्याने त्याची प्रतिमा अबाधित ठेवली आहे. या पायी प्रवासादरम्यान ॲड. श्रीनिवास वायकर यांचे वेळोवेळी विचारपूस आणि मार्गदर्शन मिळाले. यावेळी या पायी प्रवासामध्ये खूप काही शिकायला मिळालं. लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

आवड असली की सवड आपोआप मिळते

विलास याने यापूर्वीही मोटारसायकलवर ५ हजार ८०० किलोमीटरचा प्रवास करत ‘पर्यावरण बचाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा देत केदारनाथचे अंतर पूर्ण केले होते. त्यानंतर २०२३ मध्ये सायकलवर ५ हजार ६०० किलोमीटर अंतर देखील सामाजिक संदेश देत पूर्ण केले होते. आवड असली की सवड आपोआप मिळते. आवडीची वस्तू मिळाली नाही तर मिळालेल्या वस्तूची आवड निर्माण झाली पाहिजे. या म्हणीप्रमाणे लवकरच मी माऊंट एव्हरेस्ट व किलीमांजरो सर करणार असल्याचे विलास याने यावेळी सांगितले.

Web Title: Out for snakebite awareness Reached the milestone of 1800 km on foot and directly reached Kedarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.