बारामती नगरपरिषद निवडणूक : ४१ जागांपैकी २१ जागा महिलांसाठी राखीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 09:46 AM2022-06-14T09:46:39+5:302022-06-14T09:50:18+5:30
लनेने पुरुषांपैकी महिलांची संख्या अधिक...
बारामती :बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडत सोमवारी (दि. १३) जाहीर करण्यात आले. २० प्रभागातील ४१ जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले. यामध्ये २० प्रभागांतील ४१ जागांपैकी २१ जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पुरुषांना २० जागा मिळणार आहेत. तुलनेने पुरुषांपैकी महिलांची संख्या अधिक असल्याने नगरपरिषदेवर महिलाराज असण्याचे संकेत आहेत.
नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. सोमवारी झालेल्या आरक्षणाच्या चिट्ठी शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. यावेळी शहरातील विद्यमान नगरसेवक, इच्छुक व अनेक बारामतीकर उपस्थित होते. सोडतीनंतर अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले, तर काहींना अनपेक्षित लॉटरी लागल्याचा आनंद झाला. १ ते १९ प्रभागांत प्रत्येकी दोन, तर शेवटच्या २० व्या प्रभागांत ३ नगरसेवक निवडून येतील. नव्याने जाहीर झालेल्या प्रभागामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या आखाड्यात उतरताना विचार करावा लागणार आहे.
नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे- प्रभाग क्र-१ - अ - अनुसूचित जाती महिला, ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र- २-अ- सर्वसाधारण महिला - ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र - ३-अ- सर्वसाधारण महिला, ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र- ४ - अ- सर्वसाधारण महिला - ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र. - ५ - अ- सर्वसाधारण महिला - ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. - ६ अ- सर्वसाधारण महिला,- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. - ७ - अ सर्वसाधारण महिला - ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र. - ८ -अ - सर्वसाधारण महिला- ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र. - ९ -सर्वसाधारण महिला - ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र. - १० - अ - सर्वसाधारण महिला - ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र.- ११- अ -सर्वसाधारण महिला- ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र - १२- अ - अनुसूचित जाती ( महिला ) ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र - १३ - अनुसूचित जाती ( महिला ) ब - सर्वसाधारण, प्रभाग क्र. - १४ - अनुसूचित जाती - ब- सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. - १५ - अ सर्वसाधारण (महिला) - ब - सर्वसाधारण, प्रभाग -१६ - अनुसूचित जाती - ब - सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१६ अ - अनुसूचित जाती - ब - सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१७ -अ- सर्वसाधारण (महिला) - ब - सर्वसाधारण, प्रभाग - १८ - अ- अनुसूचित जाती - ब - सर्वसाधारण (महिला), प्रभाग -१९ -अ-अनुसूचित जाती ( महिला ) ब - सर्वसाधारण, प्रभाग - २० - अ - अनुसूचित जाती - ब - सर्वसाधारण (महिला) - क - सर्वसाधारण (महिला).