कुतुहलापोटी बुधवार पेठेतील 'त्या गल्लीत' गेले अन् तिघांनी मारहाण करुन लुबाडले

By विवेक भुसे | Published: May 10, 2023 03:52 PM2023-05-10T15:52:57+5:302023-05-10T16:00:55+5:30

महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मित्रांना मध्यरात्रीनंतर कुतुहूल म्हणून 'त्या' गल्लीत जाणे महागात पडले

Out of curiosity Budhwar peth to that street in and was beaten and robbed by three people | कुतुहलापोटी बुधवार पेठेतील 'त्या गल्लीत' गेले अन् तिघांनी मारहाण करुन लुबाडले

कुतुहलापोटी बुधवार पेठेतील 'त्या गल्लीत' गेले अन् तिघांनी मारहाण करुन लुबाडले

googlenewsNext

पुणे: महाविद्यालयात शिकणारे दोघे मित्र मध्यरात्रीनंतर कुतुहल म्हणून वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या बुधवार पेठेत गेले. तेव्हा तिघा चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन ४० हजारांचे मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेले. याबाबत मांजरी येथील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या २० वर्षाच्या तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार श्रीकृष्ण टॉकीजजवळील ढमढेरे गल्लीत ३ मे रोजी पहाटे ३ वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून मांजरीतील एका हॉस्टेलवर राहतो. मध्यरात्रीनंतर तो मित्राबरोबर कोथरुडला जेवायला जात होते. त्यावेळी वाटेत सिटी पोस्टजवळ त्यांनी मोटारसायकल पार्क केली. त्यानंतर उत्सुकतेपोटी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण टॉकीज समोरील ढमढेरे गल्लीत ते चालत गेले. त्यावेळी तिघे जण मोटारसायकलवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांच्यातील एकाने कॉल करण्यासाठी मोबाईल मागितला. तेव्हा फिर्यादी यांनी रीचार्ज संपला आहे, असे सांगितले. तेव्हा त्यांनी दोघांना मारहाण करुन त्यांच्याकडील ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन ते मोटारसायकलवरुन पळून गेले. या सर्व प्रकारामुळे ते घाबरुन तेथून परत हॉस्टेलवर आले. त्यानंतर या प्रकाराबाबत मित्रांनी धीर दिल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे येऊन मंगळवारी तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अभंग तपास करीत आहेत.

Web Title: Out of curiosity Budhwar peth to that street in and was beaten and robbed by three people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.