पूर्ववैमनस्यातून दोघा भावांवर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:02+5:302021-08-18T04:14:02+5:30
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघा भावांवर तलवारीने व फरशीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या ...
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघा भावांवर तलवारीने व फरशीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आकाश रवी सरोदे (वय २२), सुदर्शन रामू जाधव (वय १९, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) आणि अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय २०, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समीर भीमाशंकर नरळे (वय २२, रा. मंगेश तुपे चाळ, कावळेवस्ती) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्रांची आरोपी यांच्याबरोबर दुपारी भांडणे झाली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र विशाल गायकवाड व त्यांचा भाऊ गणेश हे शेवाळवाडी मार्केटमागील कॅनॉल रोडवरून जात होते. यावेळी टोळक्याने त्यांना अडविले. टोळक्याने विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करून जबर जखमी केले. तसेच फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.