अरणीतील बटाटा विक्रीसाठी अखेर बाहेर
By admin | Published: November 19, 2014 04:32 AM2014-11-19T04:32:01+5:302014-11-19T04:32:01+5:30
चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने महिनाभरापूर्वी अरणीत ठेवलेला बटाटा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे.
पेठ : चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने महिनाभरापूर्वी अरणीत ठेवलेला बटाटा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे. शेवटच्या टप्प्यातील अरणीतील बटाटे प्रति १० किलोंना ३३० ते ३३३ अशा चढ्या भावाने विकला जात आहे.
बटाटा उत्पादनातून ज्या शेतकऱ्यांना एका पिशवी बियाण्याला २ ते ३ पिशव्यांचे गळीत निघाले, त्यांना गुंतवलेल्या भांडवललाच्या दुप्पट म्हणजे १ रुपयाला १ रुपया या प्रमाणात फायदा झाला.
तर, ज्या शेतकऱ्यांनी चांगली मशागत व खतांचा वापर करून योग्य हवामान प्राप्त झाले, त्यांना १
पिशवी बियाण्याला ४ ते ५ पिशव्या बटाटे उत्पादन मिळाले. त्यांना २९० ते ३०० रुपये प्रतिकिलो बाजारभावाने गुंतविलेल्या एकूण भांडवलाच्या तिप्पट फायदा झाला. ५० हजार
रुपये प्रतिएकर शेतीला पूर्ण खर्च झाला असेल, तर चांगले
गळीत निघाले तर दीड लाख उत्पन्न निघत आहे.
कुरवंडी येथील बाळशिराम नाथा तोत्रे या शेतकऱ्याला १ पिशवीला ४ पिशव्या बटाटा गळीत निघाले, तर पेठ येथील श्री वाकेश्वर शिक्षण संस्थेच्या मालकीच्या शेतात करार पद्धतीने शेती केलेले शेतकरी राजेंद्र धुमाळ व पांडुरंग चिकणे यांना संपूर्ण सातगाव पठार भागात सर्वाधिक प्रति ५० किलो पिशवी बियाण्यांपासून ८ ते ९ पिशव्या बटाटा उत्पादन निघाले. (वार्ताहर)