शहरात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक : दिवसभरात नवे ६ हजार २२५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:10+5:302021-04-05T04:09:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा उद्रेक रविवारी दिसून आला़ एका दिवसात तब्बल ६ हजार २२५ नवे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढीचा उद्रेक रविवारी दिसून आला़ एका दिवसात तब्बल ६ हजार २२५ नवे रूग्ण तपासणीमध्ये आढळून आले असून, तपासणी केलेल्यांमध्ये तब्बल ३५़२ टक्के नागरिक हे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे़ शहरात कोरोना आपत्तीनंतर सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट व सर्वाधिक रूग्णसंख्या रविवारी म्हणजे ४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे़
दरम्यान आज दिवसभरात शहरातील ४१ जणांचा, तर शहराबाहेरील पण पुण्यात उपचार घेणाऱ्या ११ अशा ५२ जणांचा मृत्यू झाला आहे़ गेल्या काही महिन्यातील मृत्यूचाही हा आकडा सर्वाधिक असून, शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही रविवारी १़़ ८३ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर १७ हजार ७७४ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ सध्या शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ३ हजार ८७६ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर ९०१ रूग्ण हे गंभीर आहेत़ तर आज दिवसभरात ३ हजार ७६२ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४० हजाराच्या पुढे गेला असून, सध्या शहरात ४१ हजार ९४० सक्रिय रूग्ण आहेत़
शहरात आजपर्यंत १५ लाख ५७ हजार ६२७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ९० हजार ४४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ४२ हजार ६५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ४५२ झाली आहे़
==========================