Pune Corona News: पुणे शहरात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक: दिवसभरात तब्बल नवे ६ हजार २२५ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 08:21 PM2021-04-04T20:21:28+5:302021-04-04T20:22:02+5:30

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३५.२ टक्के

Outbreak of corona outbreak in Pune city: 6 thousand 225 new patients in a day | Pune Corona News: पुणे शहरात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक: दिवसभरात तब्बल नवे ६ हजार २२५ रूग्ण

Pune Corona News: पुणे शहरात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक: दिवसभरात तब्बल नवे ६ हजार २२५ रूग्ण

Next
ठळक मुद्देआजच्या दिवशी सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्येची नोंद

पुणे: शहरात रविवारी कोरोनाबाधितांच्या वाढीचा उद्रेक झालं आहे. एका दिवसात तब्बल ६ हजार २२५ नवे रूग्ण आढळून आले असून तपासणी केलेल्यांमध्ये तब्बल ३५.२ टक्के नागरिक हे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे़. शहरात कोरोना आपत्तीनंतर सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट व सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद ४ एप्रिलला झाली आहे़. दरम्यान आज दिवसभरात शहरातील ४१ जणांचा तर शहराबाहेरील परंतु पुण्यात उपचार घेणाऱ्या ११ अशा ५२ जणांचा मृत्यू झाला आहे़.  गेल्या काही महिन्यातील मृत्यूचाही हा आकडा सर्वाधिक असून, शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही रविवारी १८.३ टक्के इतकी आहे़. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर १७ हजार ७७४ जणांची तपासणी करण्यात आली आहे़. सध्या शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ३ हजार ८७६ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़. तर ९०१ रूग्ण हे गंभीर आहेत़. आज दिवसभरात ३ हजार ७६२ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़. शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४० हजाराच्या पुढे गेला असून, सध्या शहरात ४१ हजार ९४० सक्रिय रूग्ण आहेत़. शहरात आजपर्यंत १५ लाख ५७ हजार ६२७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ९० हजार ४४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ४२ हजार ६५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़  शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ४५२ झाली आहे़. 
 

Web Title: Outbreak of corona outbreak in Pune city: 6 thousand 225 new patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.