अंजीरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:10 AM2020-12-06T04:10:05+5:302020-12-06T04:10:05+5:30
खोर :येथील अंजीर फळ बागावरांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच पावसामुळे नुकसान झाले ...
खोर :येथील अंजीर फळ बागावरांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच पावसामुळे नुकसान झाले होते. त्यातच आता रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
खोरच्या परिसरात जवळपास १२५ एकर क्षेत्र हे अंजीर बागांचे असून यामध्ये २ लाखांच्या आसपास अंजीराची झाडे आहेत. अंंजीरांच्या पानावर तांबेरा, बुरुशी, करपा, फळकुज, खोडावरील काळी बुरुशी, फळ गळणे या समस्यांंचा सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. . या रोगामुळे पानगळ होते त्यामुळे अंजीर फळावर काळे टिपके पडतात. त्यामुळे फळाची किंंमत अत्यंत कमी होते व दर्जा देखील कमी होतो. काळया बुरुशी मुळे खोड़ावरील साल संपूर्ण नष्ट होते त्यामुळे झाड मरण्याचे प्रमाण वाढते आहे. या भागामधील शेतकर्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या फळ बागांचे नुकसान भरपाई व पंचनामे करण्याची मागणी केली होती. मात्र या नुकसान ग्रस्त फळ बागांच्या पंचनाम्याला आजही केराची टोपली फिरवली गेली असून येथील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम कृषी विभागकडुन होत आहे.
लाखो रुपये खर्च करुन शेतकऱ्यांनी फळ बागा टिकविल्या आहेत. मात्र करपा सारख्या रोगाच्या प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला गेला आहे. सध्या शेतकऱ्यांना एम ४५, बाविस्टिन, जटायु, एन्त्राकॉल, तसेच कीटक नाशके मोनोक्रोटोफोस, इमिडाक्लोरोफिल, नॉन अशा रासायनिक खतांची फवारणी आजच्या परिस्थितिला करावी लागत आहे. या भागामधील शेतकर्यांनी मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचे पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.
अंजीर फळ बागावर पडत असलेला करपा जातीचा रोग हा शेतकरी वर्गाची डोकेदुखी ठरत आहे. करपा रोगाच्या ग्रहणाने अंजीर उत्पादक शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे.लाखो रुपये खर्च करुन शेतकºयांनी फळ बागा टिकविल्या आहेत. मात्र करपा सारख्या रोगाच्या प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला गेला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्याची आमची मागणी आहे.
केतन डोंबे, शेतकरी
फोटोओळ : सध्या खोर (ता. दौंड) येथील अंजीर फळ बागावर पडत असलेला करपा जातीचा रोग हा शेतकरी वगार्ची डोकेदुखी ठरत आहे. (छायाचित्र : रामदास डोंबे)
0५१२२0२0-दौंड-0२
----------------