अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक ; बारामतीत फाेडली बस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 04:01 PM2019-10-06T16:01:05+5:302019-10-06T16:06:00+5:30

आरे वृक्षताेडीचा विराेध करण्यासाठी गेलेल्या प्रकाश आंबेडकरांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे पडसाद बारामती येथे उमटल्याचे दिसून आले.

Outbreak of vanchit's activists after the detain of Prakash Ambedkar ; The bus broke down in Baramati | अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक ; बारामतीत फाेडली बस

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांचा उद्रेक ; बारामतीत फाेडली बस

googlenewsNext

बारामती  ः  मुंबईतील आरे येथे करण्यात आलेल्या वृक्षताेडीचा निषेध नाेंदविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे आरे येथे गेले असता पाेलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. आंबेडकरांना ताब्यात घेतल्याची घटना समजताच राज्यातील कार्यकर्ते आता आक्रमक झाले असून बारामती येथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ एसटी बसवर दगडफेक केली आहे. यावेळी सरकारचा निषेध देखील करण्यात आला. 

मुंबईमधील आरे जंगलातील झाडे कापण्यावरून राज्यभर सध्या राज्य सरकार व मेट्रो प्रशासस विरोध झाला आहे. या पार्श्वभूमीवर बहूजन वंचीत आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे आरे परिसरात गेल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर लगेचच प्रकाश आंबेडकर यांना अटक झाल्याचे संदेश सोशल मिडीयामध्ये फिरू लागले. बारामती येथील गुणवडी चौकात बारामती-दौंड शटल बस (क्रमांक एमएच १२, इएफ ६३६०) ही बस आली असता. तोंडाला रूमाल बांधलेल्या चार ते पाच तरूणांनी हात करून बस थांबवली. चालकाने बस थांबवल्यानंतर यातील एका तरूणाने बसवर ‘बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहिर निषेध ’ आशयाचा मजकुर असलेला कागद चिटकवला. त्यानंतर काही कळण्याच्या आतच बसच्या समोरील काचेवर दगडफेक केली. 

बसच्या समोरील दोन्ही काचा फुटल्या. यावेळी केबीनमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या एका वृद्धास पायाला काच लागली यामध्ये वृद्धास किरकोळ जखम झाली आहे. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे गुणवडी चौकात एकच पळापळ झाली. तसेच बसकडे नागरिकांनी धाव घेतली.

दरम्यान पाेलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेऊन पवई पाेलीस स्टेशनला नेले आहे. याबाबत आंबेडकरांनी साेशल मीडियावर पाेस्ट लिहीत माहिती दिली आहे. 'पोलिसांनी मला ताब्यात घेतले आहे.मला अटक केलेली नाही. पोलिसांसोबत मी पवई पोलिस स्टेशनमध्ये आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कायदा सुव्य़वस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी' असे आवाहन त्यांनी आपल्या पाेस्टच्या माध्यमातून केले आहे. 

Web Title: Outbreak of vanchit's activists after the detain of Prakash Ambedkar ; The bus broke down in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.