वाल्हेत साथीचे आजारातने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:34+5:302021-07-28T04:11:34+5:30
वाल्हे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असताना, आता डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे उद्भवण्याची शक्यता नाकारता ...
वाल्हे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असताना, आता डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यूचा फैलाव कमी प्रमाणात असला तरी, कोरोनाशी लढा देताना नागरिकांना डेंग्यूपासून देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
मागील पंधरा दिवसांत वाल्हे गावातील खाजगी रुग्णालयात सात
डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. अगोदरच करोनाचा समावेश झाला आहे. त्यातच कोरोना पाठोपाठ डेंग्यूचा ग्रामीण भागात प्रवेश झाला आहे त्यात कमी प्रमाणात का होईना आज ही कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहे.
पावसाची रिमझिम चालू असल्या मुळे
वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
वातावरणातील बदल व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र मलेरिया, डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या साथीत वाढ होताना दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना जुलै महिन्यातच डेंग्यू व चिकुणगुनिया साथीच्या आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांच्यात भितिचे वातावरण तयार झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान आरोग्य व वैद्यकीय विभागापुढे आहे.
वाल्हे ग्रामपंचायती अंतर्गत जवळपास सर्वच वाड्या वस्तीवरील अंतर्गत गटार योजनेचे कामे पुर्ण झाली आहेत. वाल्हे गावअंतर्गत शंभर टक्के अंतर्गत गटार योजना पुर्ण झाली असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले यांनी दिली.
घर, परिसरात स्वच्छता ठेवाव गरज नसलेले निकामी टायर, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रीज, कुलर्सच्या ट्रे मध्ये स्वच्छता ठेवावी. नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. डेंग्यू व चिकुनगुणियाचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब जरी खरी असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता आजूबाजूचा परिसर व फ्रीजच्या पाठीमागे जमा होणारे पाणी काढून टाकावे असे आवाहन वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले आदींनी केले आहे.
--
चौकट
--
घराघराचे सर्वेक्षण
वाल्हे गावातील अडीचशे ते तीनशे घराचांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून मंगळवार पर्यंत पूर्ण करण्यात आला असून, वाल्हे ग्रामपंचायतीने परिसरात धुराडीची फवारणी केली असून, परिसरात पावसाने वाढलेल्या गवतावर तनाशक फवारणी केली आहे. तसेच ग्रामसुरक्षा यंञणेच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली जात आहे. अशी माहिती वाल्हे ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.
--
चौकट
वाल्हे परिसरातील नागरिकांनी डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आदी आजारांना घाबरून न जाता, संबंधित रूग्णाला आजाराची लक्षणे जाणवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन संबंधित आजारांवरील उपचार घ्यावेत. वाल्हे गावात मागील पंधरा दिवसांपासून सात रूग्ण डेंग्यू आजाराचे आढळून आले आहेत. मात्र संबंधित रूग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून, संबंधित रूग्णांनी
प्राथमिक आरोग्य केंद्राला याबाबत माहिती दिली नव्हती". अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, डॉ. आदित्य धारूडकर यांनी दिली.
--
फोटो २७ वाल्हे डेंग्यू सदृष्य आजार
फोटो ओळ : प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी वतिने आशा वर्कर च्या मदतीने घरोघरी जाऊन तपासनी करित आहेत.
--
फोटो ओळ : २ वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतिने गावतील गल्ली बोळात जाऊन धुराडी फवारनी करत आहेत.