बाहेरुन स्पा सेंटर; आत चालायचा वेश्याव्यवसाय, एकाला बेड्या
By भाग्यश्री गिलडा | Updated: January 19, 2024 16:00 IST2024-01-19T16:00:15+5:302024-01-19T16:00:54+5:30
पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर

बाहेरुन स्पा सेंटर; आत चालायचा वेश्याव्यवसाय, एकाला बेड्या
पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्याला सिंहगडरोड पोलिसांनी अटक केली आहे. नितीन गिरमल कांबळे (२९, रा. नर्हे) असे अटक केल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे.
मुलींना वेश्याव्यवसासाठी प्राप्त करून घेऊन नर्हे परिसरात असलेल्या रॉयल थाई स्पा या स्पा सेंटरमध्ये नितीन कांबळे हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या विशेष पथकाने याठिकाणी धाड टाकून आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असल्याचे प्राथमिक चौकशीतून लक्षात आले. यावेळी झडती घेतली असता आरोपीकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल, ग्राहक नोंद वही, पासबुक असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी नितीन कांबळे याच्यावर अनैतिक मानवी वःतून प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केलेली आहे.