मैदानी खेळ होताहेत नामशेष, मैदाने उपलब्ध होणे झाले कठीण, मुले मोबाइलच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:07 AM2017-10-24T02:07:55+5:302017-10-24T02:08:00+5:30

रावेत : उपनगरातील अपार्टमेंट व बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे.

Outdoor sports are becoming extinct, playgrounds become difficult, children get mobilized | मैदानी खेळ होताहेत नामशेष, मैदाने उपलब्ध होणे झाले कठीण, मुले मोबाइलच्या आहारी

मैदानी खेळ होताहेत नामशेष, मैदाने उपलब्ध होणे झाले कठीण, मुले मोबाइलच्या आहारी

googlenewsNext

रावेत : उपनगरातील अपार्टमेंट व बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. यामुळे घरासमोरील रस्तेच चिमुकल्यांसाठी खेळपट्टी झाले आहे. मुलांना आपल्या आवडी आता घरातच शोधत बसावे लागत आहे. मैदाने नसल्याने मोबाइलवरील गेम खेळण्यास मुले प्राधान्य देत आहेत.
शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने नाईलाजाने मुलांना क्रिकेट असो वा फुटबॉल हे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळावे लागत आहेत. रस्त्यावर अपघात होतात म्हणून अनेक जणांना इच्छेला मुरड देत सक्तीने कॉम्प्युटर गेम खेळतात. मातीमध्ये खेळताना पडणे, खरचटणे, त्यातून शिकण्याचा अनुभव मिळणे आता विरळच़ त्यामुळे इमारतीच्या बाहेरील रस्त्यांवरील दुपारी किंवा रात्री वाहनांची गर्दी कमी असली की, खेळायचे असा चिमुकल्यांचा सुटीतील दिनक्रम बनू लागला आहे.
>दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्यापेक्षा पालक मुलांना बैठे खेळ खेळायला सांगतात. सध्या चिमुकल्यांना बैठे खेळांमध्ये सर्वात जास्त बुद्धिबळ आणि कॅरम खेळायला आवडते. सापशिडी काहीप्रमाणात हरवत असून त्याची जागा वैज्ञानिक आणि बौद्धिक खेळांनी घेतल्याचे दिसून आले आहे. मैदानावर जाऊन मातीत खेळणे, रस्त्यावर किंवा बागेत जाऊन धिंगाणा घालण्यापेक्षा घरात बसून कॉम्प्युटरवरील गेम्स खेळण्याकडे २५ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांचा कल आहे. कॉम्प्युटर गेम्स येण्यापूर्वी व्हीडिओ गेम्स मोठ्या प्रमाणात खेळले जात होते. त्यामुळे डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे लहान मुलांना चष्मा हा फार कमी वयात लागतो हे प्रमाण ३0 टक्के आढळते. विद्यार्थ्यांचे डोळ्यांच्या आजाराने अभ्यासावरील लक्ष विचलित होत आहे.
आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे चिमुकल्यांचा कल मैदानी खेळ खेळण्याकडे वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, क्रिकेट, फुटबॉल तर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आणि टेनिस खेळायची क्रेझ वाढली आहे. परंतु पुरेशी मैदाने नसल्याने त्यांच्या आवडीला वाव मिळेनासा झाला आहे.
शहरात मैदानांची संख्या कमी झाल्याने मुलांचा मैदानात खेळण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. नाईलाजाने कॉलनीच्या कोपºयात घरासमोरील रस्त्यावर मुलांना जीव धोक्यात घालून खेळावे लागत आहे. शहरात अजूनही बोटावर मोजता येतील एवढीच मोठी मैदाने तग धरून आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य मुलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळण्यास द्यावे. काही मैदाने शहरात आहेत त्याचा महापालिकेने विकास करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Outdoor sports are becoming extinct, playgrounds become difficult, children get mobilized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.