करंजविहिरे आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग रुग्णांसाठी फायदेशीर : शरद बुट्टे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:41+5:302021-08-14T04:13:41+5:30
करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हंट्समन कंपनीच्या वतीने मल्टिपर्पझ हेल्थ केअर सेंटरसाठी शेड बांधून देण्यात आले. याचे उद्घाटन ...
करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हंट्समन कंपनीच्या वतीने मल्टिपर्पझ हेल्थ केअर सेंटरसाठी शेड बांधून देण्यात आले. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील हंट्समन व्यवस्थापकीय महासंचालक राहुल टिकू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
हंट्समन व्यवस्थापकीय महासंचालक राहुल टिकू म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील गावे आमचा परिवार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे आद्य कर्तव्य आणि जबाबदारी समजून कंपनीतर्फे आरोग्यसंप्रदाय बाह्यविभागाची निर्मिती केली. याचा फायदा येथील नागरिकांना येत्या काळात होईल. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री महाजन, हंट्समन राजकुमार दळवी, सरपंच सुदाम कोळेकर, सीएसआर हेड रायोमंड सभावाला, आशिष बढे, राजकुमार दळवी, आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरूग्ण विभागाचे उद्घाटन करताना राहुल टिकू, शरद बुट्टे पाटील आणि मान्यवर.