महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत बाह्यरुग्ण विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:49+5:302021-07-21T04:09:49+5:30
आगाशे म्हणाले, ''समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ व सेवासुविधा ...
आगाशे म्हणाले, ''समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ व सेवासुविधा वाढवण्यासाठी १९९१ साली महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेची स्थापना करण्यात आली.''
संस्थेमार्फत मानसिक आरोग्यविषयक विविध पाठ्यक्रम चालवून समाजामध्ये तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात येत आहे. एम. फिल. सायकॅट्रीक सोशल वर्क हा पाठ्यक्रम चालविणारी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था ही राज्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेला नुकतीच भारतीय पुनर्वास परिषदेमार्फत एम. फिल. क्लिनिकल सायकॉलॉजी हा पाठ्यक्रम सुरू करण्यास परवानगी मिळालेली आहे, असे संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवत यांनी सांगीतले.
उद्घाटनानंतर डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. इवान नेट्टो, डॉ. कृष्णा कदम, डॉ. निशिकांत थोरात, चेतन दिवाण, श्रीकांत पवार तसेच संस्थेतील विविध पाठ्यक्रमाचे अध्यापक, विद्यार्थी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.