चाकणला समता परिषदेचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:08+5:302021-06-24T04:09:08+5:30

या वेळी तुकाराम कांडगे, राम गोरे, प्रकाश भुजबळ, मच्छिंद्र गोरे, अशोक बिरदवडे, आनंद गायकवाड, शोभा शेवकरी, मंगल जाधव, अरुणा ...

Outrage agitation of Chakanla Samata Parishad | चाकणला समता परिषदेचे आक्रोश आंदोलन

चाकणला समता परिषदेचे आक्रोश आंदोलन

Next

या वेळी तुकाराम कांडगे, राम गोरे, प्रकाश भुजबळ, मच्छिंद्र गोरे, अशोक बिरदवडे, आनंद गायकवाड, शोभा शेवकरी, मंगल जाधव, अरुणा पगारे, ज्योती वाघ, जयश्री खेडकर, अलका जोगदंड, स्मिता शहा, ॲड.मालिनी शिंदे, सुदाम शेवकरी, ॲड .प्रीतम शिंदे, अशोक जाधव, बापू वाघ, नंदकुमार जाधव, शेखर पिंगळे सह सर्व पक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन आक्रोश आंदोलनची सुरुवात करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशनमध्ये दिलेल्या निकालामुळे संपूर्ण देशातील, तसेच महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे, संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. मंडल आयोग व ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने ओबीसींना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसीचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ओबीसी प्रवर्गातील वंचित जनसमूहांना लोकशाही प्रक्रियेत पंचायतराज संस्थांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे.

सध्या उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने त्वरित उचित कार्यवाही करून, ओबीसीच्या

हक्काच्या २७% आरक्षणाचे रक्षण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने यावेळी देण्यात आला. त्याबाबतचे निवेदन खेडचे तहसीलदार यांना देण्यात आले.

समता परिषदेच्या वतीने आक्रोश आंदोलन

Web Title: Outrage agitation of Chakanla Samata Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.