लसीकरण केंद्र बंद असल्याने उत्तमनगरमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:00+5:302021-05-05T04:15:00+5:30

लसीकरणामुळे कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. असे असतानादेखील लसींचा पुरवठाच रोखल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. कोरोनाचा ...

Outrage in Uttamnagar as vaccination center is closed | लसीकरण केंद्र बंद असल्याने उत्तमनगरमध्ये तीव्र नाराजी

लसीकरण केंद्र बंद असल्याने उत्तमनगरमध्ये तीव्र नाराजी

Next

लसीकरणामुळे कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. असे असतानादेखील लसींचा पुरवठाच रोखल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरणाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. परंतु असे असताना लसच मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

कोरोनामुळे सर्वत्र मृत्यूचे तांडव चालले असताना लसीकरणामुळे कोरोना रोखण्यास मदत मिळेल. कोरोनाचा संसर्ग झालाच तरी त्याचे परिणाम एवढे गंभीर नसणार आहेत. सरकारने गंभीर दखल घेऊन लसीकरणाची मोहीम अजूनही मोठ्या प्रमाणात राबवावी, असे अनेकांचे म्हणणे आहे.

शिवणे-उत्तमनगर भागात अतुल दांगट ह्यांच्याबरोबर संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की, लसीकरणाचे प्रमाण वाढवायची गरज असताना गेल्या चार दिवसांत लसीकरण पूर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तरी प्रशासनाने हस्तक्षेप करून लवकरात लवकर लसींचा पुरवठा पूर्ववत करावा.

Web Title: Outrage in Uttamnagar as vaccination center is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.