पुण्यातील संतापजनक घटना! वडिलांना जेवणाचा डबा देऊन घरी निघालेल्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:21 PM2022-08-09T18:21:19+5:302022-08-09T18:21:35+5:30

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका सात वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार

Outrageous incident in Pune Sexual abuse of a child who went home after giving a lunch box to her father | पुण्यातील संतापजनक घटना! वडिलांना जेवणाचा डबा देऊन घरी निघालेल्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

पुण्यातील संतापजनक घटना! वडिलांना जेवणाचा डबा देऊन घरी निघालेल्या चिमुकलीचे लैंगिक शोषण

Next

किरण शिंदे 

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका सात वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही चिमुरडी वडिलांना जेवणाचा डबा देऊन परत जात असताना हा प्रकार घडलाय. या घटनेनंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर आरोपी मात्र फरार झाला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुरडीच्या वडिलांचा पुणे स्टेशन परिसरात चहा विक्रीचा स्टॉल आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती. डबा देऊन परत येत असताना अज्ञात आरोपीने तिला उचलून घेत अपहरण केले. त्यानंतर फलाट क्रमांक सहा च्या भिंती लगत असणाऱ्या कन्स्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील बंद असणाऱ्या खोलीत नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. चिमुरडीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र लघुशंका करण्याच्या पाहण्याने ही मुलगी बाहेर आली आणि आरोपीच्या तावडीतून निसटली. 

दरम्यान घरी आल्यानंतर तिने घडलेला हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप त्याचा शोध लागला नाही.. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Outrageous incident in Pune Sexual abuse of a child who went home after giving a lunch box to her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.