पुण्यातील संतापजनक प्रकार: बारा वर्षाच्या मुलाला कबुतराची विष्टा खायला लावली

By विवेक भुसे | Published: July 27, 2023 10:21 AM2023-07-27T10:21:46+5:302023-07-27T10:21:54+5:30

पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकीही मुलाला दिली

Outrageous incident in Pune Twelve year old boy forced to eat pigeon droppings | पुण्यातील संतापजनक प्रकार: बारा वर्षाच्या मुलाला कबुतराची विष्टा खायला लावली

पुण्यातील संतापजनक प्रकार: बारा वर्षाच्या मुलाला कबुतराची विष्टा खायला लावली

googlenewsNext

पुणे: कबुतर घेतल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एका १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन त्याला कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूला नेऊन कबुतराची विष्टा खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कात्रजमधील संतोषनगर येथील एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी  सराईत गुन्हेगार अमोल आडम याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील बाजूस मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कबुतरे पाळली होती. त्यातील एक कबुतर फिर्यादीच्या १२ वर्षाच्या मुलाने आणले होते. त्यावरुन अमोल आडम हा त्याच्या आणखी तीन साथीदारांसह संतोषनगरमध्ये आला. त्यांनी हवेत हत्यारे फिरवून कोणी जर मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकीन, असे म्हणून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या १२ वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण केली व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला दुचाकीवर बसवून कात्रज येथील साई अपार्टमेंट येथे नेले. तेथे त्याला कबुतराची विष्टा खायला लावली. त्यानंतर पोलिसांना आमचे घर दाखविले तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन त्याला साई मंदिराजवळ सोडून दिले. त्यानंतर त्याने हा प्रकार वडिलांना सांगितला. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे तपास करीत आहेत.

Web Title: Outrageous incident in Pune Twelve year old boy forced to eat pigeon droppings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.