पुण्यातील संतापजनक घटना! दोन सख्या भावांकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार
By विवेक भुसे | Published: July 21, 2022 04:23 PM2022-07-21T16:23:17+5:302022-07-21T16:23:26+5:30
शोहेब अन्सारी (वय ३५) आणि अन्वर अन्सारी (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत
पुणे : दोन सख्या भावांनी पुण्याला काळीमा फासण्याचे कृत्य केल्याचे समोर आले असून, गावाकडील १९ वर्षाच्या तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करत फ्लॅटवर नेले. व त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. शोहेब अन्सारी (वय ३५) आणि अन्वर अन्सारी (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी १९ वर्षाच्या पिडीत तरुणाने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील दुराणी कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी रात्री अकरा ते साडेअकरा या वेळेत घडला आहे.
पिडीत तरुण आरोपींच्या गावाकडील आहे. त्यामुळे तो आरोपींना ओळखतो. तो रात्री अकराच्या सुमारास कामावरून घरी निघाला होता. घराजवळ आल्यानंतर शोहेब याने दुचाकीवरून येऊन त्याला रस्त्यात मारहाण केली. पिडीत तरुणाला दुचाकीवरून त्याच्या घरी नेले. त्याठिकाणी मोठ्या भावाला देखील बोलावून घेतले. त्यानंतर तरुणासोबत अनैसर्गिककृत्य केले. त्याचे शुटींग अन्वर अन्सारी याने त्याच्या मोबाईलमध्ये केले. त्यानंतर त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.