अरे बापरे! 'अनलॉक' मध्ये रेल्वे व विमानाने पावणे चार लाखांवर प्रवाशांची पुण्यात ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 09:15 PM2020-07-25T21:15:00+5:302020-07-25T21:15:02+5:30

लॉकडाऊननंतर देशभरात काही प्रमाणात दि. २५ मे पासून विमानसेवा तर दि. १ जून पासून रेल्वे सेवा सुरू झाली.

Over 4 lakh passengers come and go in Pune by train and plane in Unlock | अरे बापरे! 'अनलॉक' मध्ये रेल्वे व विमानाने पावणे चार लाखांवर प्रवाशांची पुण्यात ये-जा

अरे बापरे! 'अनलॉक' मध्ये रेल्वे व विमानाने पावणे चार लाखांवर प्रवाशांची पुण्यात ये-जा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचे संकट गडद होत असताना गेल्या दोन महिन्यात पुणे सोडणारेच अधिक

पुणे : अनलॉकमध्ये रेल्वे व विमानसेवा सुरू झाल्यानंतर मागील दोन महिन्यांत सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी पुण्यात ये-जा केली आहे. त्यामध्ये सव्वा दोन लाखांहून अधिक विमानप्रवासीच आहेत. तसेच पुणे सोडणाऱ्यांचीच संख्या जवळपास तेवढीच आहे. पुण्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले असले तरी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारसा फरक पडलेला दिसत नाही.

लॉकडाऊननंतर देशभरात काही प्रमाणात दि. २५ मे पासून विमानसेवा तर दि. १ जून पासून रेल्वे सेवा सुरू झाली. पुण्यातून प्रामुख्याने दिल्ली, अहमदाबाद, जयपुर, कोची, लखनऊ, बेंगलुरू, हैद्राबाद आदी शहरांत विमानांची ये-जा सुरू आहे. तर पुणे-दानापुर (पटना) ही एकमेव रेल्वेगाडी थेट पुणे रेल्वे स्थानकातून सुटते. मुंबईतून सुटून पुणेमार्गे जाणाºया चार तर गोव्यातून येणारी एक गाडी आहे. मात्र, दानापूर एक्सप्रेसने ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर आठवडाभर विमान व प्रवाशांची संख्या १५ पर्यंत स्थिर होती. पण नंतर ये-जा करणाऱ्या विमानांचा आकडा जवळपास ५० पर्यंत वाढला. तसेच प्रवाशांचा आकडाही ४ ते ५ हजारांपर्यंत वाढत गेला. 
दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुरूवातीचे तीन-चार दिवस प्रवासी कमी झाले. पण पुन्हा त्यात वाढ होऊन दैनंदिन संख्या ३ हजारांच्या पुढे गेली. दोन महिन्यांत विमानाने सव्वा दोन लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली. रेल्वे प्रवाशांची संख्याही लॉकडाऊनमध्ये कमी झाली होती. त्यापुर्वी दानापुर एक्सप्रेसने दररोज १३५० ते १४०० प्रवासी पुणे सोडत होते. तर सुमारे ८०० ते १००० पुण्यात येणारे प्रवासी होते. अन्य गाड्यांनी सुमारे ५००-६०० प्रवाशांचीच ये-जा होत असते. त्यामुळे रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास अडीच ते तीन हजार आहे. 
----------------
विमान उड्डाणे - दिल्ली, जयपुर, अहमदाबाद, बेंगलुरू, कोची, लखनौ, हैद्राबाद आदी
दि. २४ जुलैची स्थिती 
उतरलेली विमाने - २१
प्रवासी - १३९४
उड्डाण केलेली विमाने - २१
प्रवासी - १९६९
----------------
दि. १ जून पासून पुण्यातून धावणाऱ्या गाड्या -
- पुणे ते दानापुर एक्सप्रेस
- मुंबई सीएसटी -भुवनेश्वर कोनार्क एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- मुंबई सीएसटी - गडग एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- मुंबई सीएसटी - बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- मुंबई सीएसटी - हैद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस (पुणे मार्गे)
- वास्को द गामा - निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस (पुणे मार्गे)
----------
पुण्यात ये-जा केलेल्या प्रवाशांची संख्या -
विमान प्रवासी - एकुण - सुमारे २ लाख १५ हजार
आलेले - १ लाख ३० हजार
गेलेले - ८५ हजार
रेल्वे प्रवासी - एकुण - सुमारे १ लाख ५० हजार
आलेले - ९००००
आलेले - ६० हजार
------------------

Web Title: Over 4 lakh passengers come and go in Pune by train and plane in Unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.