‘आरटीई’ला क्षमतेपेक्षा अधिक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:04+5:302021-03-08T04:11:04+5:30

पुणे : अवघ्या पाच दिवसांतच पुण्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेला ...

Over-application to RTE | ‘आरटीई’ला क्षमतेपेक्षा अधिक अर्ज

‘आरटीई’ला क्षमतेपेक्षा अधिक अर्ज

Next

पुणे : अवघ्या पाच दिवसांतच पुण्यात आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने यंदा प्रवेशाबाबत चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे. पुण्यातील १४ हजार ७७३ जागांसाठी आत्तापर्यंत २२ हजार ६६२ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३ मार्चपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. मात्र, शिक्षण विभागाकडे चार ते पाच दिवसांतच प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशाअंतर्गत आपल्या पाल्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा पर्याय अनेक पालकांनी स्वीकारला असल्याचे बोलले जात आहे.

कोरोनामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. या शाळांमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थी संख्येच्या २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो. त्यामुळे यंदा पुणे जिल्ह्यातील आरटीईच्या सुमारे अडीच हजार जागा कमी झाल्या आहेत. राज्यात आरटीई प्रवेशाच्या एकूण ९६ हजार ६२९ जागा असून या जागांसाठी एकूण ७९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहेत.

---

जिल्हा उपलब्ध जागा प्राप्त अर्ज

अहमदनगर ३०१३ १३५८

अकोला १९६० १३१४

अमरावती २०७६ १६९१

औरंगाबाद ३६२५ ४२५५

भंडारा ७९१ ६६२

बीड २१९५ १०३१

बुलडाणा २१४२ १२३३

चंद्रपूर १५७१ ११२७

धुळे ११७१ ५५९

गडचिरोली ६२४ १८४

गोंदिया ८७६ ७१९

हिंगोली ५३० १६५

जळगाव ३०६५ २२०६

जालना २२६२ ७६५

कोल्हापूर ३१८१ ६२९

लातूर १७४० १०४१

मुंबई ५२२९ ४६३२

नागपूर ५७२९ ९४१४

नांदेड १६९७ १६४०

नंदुरबार ३७९ १८५

नाशिक ४५४४ ४८९७

उस्मानाबाद ६४१ २८५

पालघर ४२७३ ४४१

परभणी ८५६ ४४१

पुणे १४७७३ २२६६२

रायगड ४२३६ ३३३१

रत्नागिरी ८६४ २६६

सांगली १६६७ ४१४

सातारा १९१६ ८५९

सिंधुदुर्ग ३४५ ४५

सोलापूर २२२८ १४५९

ठाणे १२०७४ ६५६६

वर्धा ११२९ १२४२

वाशिम ७१८ २५७

यवतमाळ १२७५ १०७१

Web Title: Over-application to RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.