महिन्यानंतर शहरात प्रथमच आढळले पाचशेच्यावर कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:48+5:302021-07-01T04:09:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात बुधवारी तब्बल एका महिन्यानंतर प्रथमच ५०० च्या वर कोरोनाबाधित आढळून आले असून, ही ...

Over the first time in a month, over five hundred corona were found in the city | महिन्यानंतर शहरात प्रथमच आढळले पाचशेच्यावर कोरोनाबाधित

महिन्यानंतर शहरात प्रथमच आढळले पाचशेच्यावर कोरोनाबाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात बुधवारी तब्बल एका महिन्यानंतर प्रथमच ५०० च्या वर कोरोनाबाधित आढळून आले असून, ही संख्या ५०८ इतकी आहे़ शहरात २९ मे पूर्वीच ५०० च्या वर दिवसाला कोरोनाबाधितांची नव्याने वाढ होत होती़ त्यानंतर मात्र हा आकडा आजपर्यंत सातत्याने ५०० च्या आतच राहिला तर काही वेळेला तो दीडशेच्या आतही आला होता़ मात्र, आजची नव्याने आढळून येणारी रुग्णसंख्या इतर दिवसांच्या तुलनेने दुप्पटच झाली असून ही शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे़

आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ७०७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ७़ ५७ टक्के इतकी आढळून आली आहे़ ही टक्केवारीही या महिन्यातील सर्वाधिक टक्केवारी ठरली. शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची सरासरी टक्केवारी ५ टक्क्यांच्या पुढे गेल्याने, लॉकडाऊनमध्ये शिथिल केलेले निर्बंध पुन्हा वाढविण्यात आले़ परंतु, जून महिन्याच्या प्रारंभी दिलेल्या लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढवून गेल्याचे आता काही प्रमाणात समोर येऊ लागले आहे़

दरम्यान, आज दिवसभरात २६६ जण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़७९ टक्के इतका आहे़ सध्या शहरात २ हजार ५५७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २८७ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ६७ हजार ९६५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७८ हजार ५१७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६७ हजार ३७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

बुधवारी बाधित - ५०८

घरी सोडले - २६६

एकूण बाधित - ४,७८,५१७

सक्रिय रुग्ण - २, ५५७

मृत्यू - १५

एकूण मृत्यू - ८ हजार ५८८

Web Title: Over the first time in a month, over five hundred corona were found in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.