कोरोनावर मात करत पुन्हा रुग्ण सेवेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:25+5:302021-05-16T04:10:25+5:30
धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे परिचारिका म्हणून उषा मुंढे कार्यरत आहेत. उषा मुंढे यांची मागील वर्षात ...
धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे परिचारिका म्हणून उषा मुंढे कार्यरत आहेत. उषा मुंढे यांची मागील वर्षात कोरोना सर्वेेेक्षण ड्यूटी चालू झाली. त्यातच त्यांना कोरोना गाठले. त्यातच पती रघुनाथ मुंढे (वय ४५) यांच्या सह मुलांनादेखील कोरोनाची लागण झाली. परिवाराला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उषा मुंढे यांची भीती अजूनच वाढली. दरम्यानच्या काळात अधिका-यांनी मुंढे यांना खूप धीर दिला.
पतीची शुगर जास्त होती त्यामुळे उषा मुंढे यांना जास्त भीती वाटत होती. उषा मुंढे रुग्णालयात उपचार घेत असताना सहकारी कर्मचारी व आधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. रुग्णालयात बेड ही उपलब्ध करून दिला. त्यांना वेळेत उपचार सुरू झाले. उषा मुंढे व त्यांचा भाऊ हेमंत नारायण उगल मोगले, वय ३३, मुलगी वैष्णवी रघुनाथ मुंढे, वय १८ या दोघांना सणस ग्राऊंडला असलेल्या कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. पती रुग्णालयात असल्याने उषा मुंढे यांना त्यांची खूप काळजी वाटत होती. परंतु दहा दिवसांच्या उपचारानंतर एकदिवस सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली व घरी सुखरुप आले.
रुग्णालयात अविरत सेवा देत असताना कोरोना पॉझिटिव्ह येऊनही रुग्ण सेवा थांबू नये यासाठी दीड वर्ष प्रयत्न केला. अखेर कोरोनानं एकदाच गाठलं, कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली. मात्र धैर्याने त्याचा सामना केला. कोरोनावर मात करत पुन्हा रुग्ण सेवेत रुजू झाले. उषा मुंढे - परिचारिका, धनकवडी.
फोटो ओळ - कोरोनावर यशस्वी मात करत ठणठणीत बरा झालेला मुंढे परिवार.