धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जात केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:09 AM2021-05-01T04:09:50+5:302021-05-01T04:09:50+5:30

धनकवडी : कोरोना संक्रमणाचा विळखा आता जवळपास प्रत्येक कुटुंबांभोवती पडला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना धैर्याने न केल्याने आणि कोरोनावरील ...

Overcoming the situation coronally by coping with the situation patiently | धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जात केली कोरोनावर मात

धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जात केली कोरोनावर मात

Next

धनकवडी : कोरोना संक्रमणाचा विळखा आता जवळपास प्रत्येक कुटुंबांभोवती पडला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना धैर्याने न केल्याने आणि कोरोनावरील उपचार वेळेत उपलब्ध न झाल्याने अनेक कुटुंबे दगावली. अशा परिस्थितीमध्ये धनकवडी मधील ॲड. कल्याण शिंदे यांच्या ८ सदस्यांच्या एकत्र कुटुंबाने मोठ्या हिंमतीने, धैर्याने, एकजुटीने आणि एकमेकांचे मनोधैर्य वाढत वकिल मित्रांच्या सहकार्याने कोरोनावर यशस्वी मात करून आदर्श निर्माण केला.

धनकवडीमधील चैतन्यनगर परिसरात ॲड. कल्याण शिंदे यांचे दहा सदस्यांचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबातील आठही सदस्य एकामागून एक कोरोना बाधित झाले होते. शहरात कोरोनाचा उद्रेकामुळे कुंटुंबासह गावी रहावयास गेले. गावाकडे आई-वडील आणि मोठ्या भावाचे कुंटूंब राहत आहे. एक आठवड्यानंतर भावाला त्रास होऊ लागला, स्थानिक डॉक्टरकडे तपासणी केल्यावर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. भावाला कुठल्याही दवाखान्यात बेड मिळत नव्हता, त्यामुळे मानसिक दडपण वाढायला लागले. कोणत्याही रुग्णालयात जागा मिळत नव्हती. म्हणून आमदारांना संपर्क साधला, त्यांनी तहसीलदारांना सांगीतले. तहसीलदारांनी हॉस्पिटलला संपर्क करून जागा उपलब्ध करुण देण्याची सूचना दिल्यावर कुठं भावाला लवळे येथे दाखल करुन घेतले.

दरम्यान दुसऱ्याच दिवशी ॲड. कल्याण शिंदे यांना त्रास जाणवू लागला म्हणून चाचणी केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्या नंतर पत्नी प्राजक्ता आणि दोन्ही मुलांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. अशा प्रकारे एकामागून एक रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आणि शिंदे परिवार अस्वस्थ झाले.

पुढे काय करावे, इतक्या सर्वांना बेड कसे आणि कुठ मिळणार, ही चिंता भेडसावायला लागली. अशावेळी दक्षिण पुणे वकिल संघटनेतील जवळचे मित्र धावून आले. दरम्यान शिंदे कुटुंबात फक्त ८५ वर्षांची आई आणि १८ वर्षाचा पुतण्या फक्त संसर्ग रहित होते.

अशा प्रकारे शिंदे कुटुंबातील बाधित सदस्य घरीच, प्रसंगी वेगवेगळ्या दवाखान्यात वेगवेगळ्या स्थळी उपचार घेत राहिले. डॉक्टरांचे उपचार, वकिल मित्रांचे सहकार्य, कुटुंबांची एकजुट, एकमेकांचे मनोधैर्य वाढवत आणि नशिबाची साथ लाभल्याने कोरोना महामारीच्या या जीवघेण्या संकटातून सहीसलामत बाहेर पडले.

चौकट

कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नका, खचू नका. अथवा कोरोनाचा आजार लपवू नका. धीरोदत्तपणे परिस्थितीला सामोरे जा. वेळीच उपचार घ्या, सकस आहार घ्या, मित्रमंडळींचे सहकार्य अवश्य घ्या. सकारात्मक विचारशक्ति आणि इच्छाशक्तिच्या जोरावर आपण कोरोनावर नक्कीच मात करू शकतो, रुग्णालयात तसेच घरच्या घरीसुद्धा यशस्वी उपचार घेऊ शकतो. हा माझा स्वानुभव आहे. - ॲड कल्याण शिंदे, धनकवडी

Web Title: Overcoming the situation coronally by coping with the situation patiently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.