जड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:08+5:302021-03-14T04:11:08+5:30
आव्हाळवाडी :जड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केले जात असल्यामुळे वाघोली-भावडी या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले ...
आव्हाळवाडी :जड वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केले जात असल्यामुळे वाघोली-भावडी या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर संबंधित परिवहन व महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर दळवी यांनी केले आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे वाघोली, लोणीकंद, केसनंद, अव्हाळवाडी, मांजरी आदि परिसरात मोठमोठ्या गृहप्रकल्पांसह गोडाऊनची बांधकामे वाढली आहेत. त्यामुळे सिमेंट, खडी, रेती, माती, सँड आदि बांधकामास लागणाऱ्या मालाची वाहनांमधून क्षमतेपेक्षा वाहतूक केली जात आहे. वाघोली-भावडी या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा माल भरून वाहणाऱ्या जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे सिमेंट कॉंक्रिटकरण रस्ता असून देखील ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
भावडी व केसनंद परिसरात दगडखाणी असल्यामुळे या रस्त्याने जड वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणावर आहे. दगड, खडी, सँड आदि मालाची वाहतूक करताना जड वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केल जात आहे. बहुतांश वाहनधारक सँडची वाहतूक करताना आच्छादन टाकत नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित विभागाकडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा संबधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दळवी यांनी केला आहे. थातूरमातूर कारवाई न करता ठोस कारवाई करावी अशी मागणी सुधीर दळवी यांनी केली आहे. संबधित परिवहन अधिकारी यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.
प्रतिक्रिया :
जड वाहनधारकांकडून क्षमतेपेक्षा माल भरून नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे वाघोली-भावडी या सिमेंट रस्त्यावर खड्डे पडले आहेत. संबधित परिवहन, प्रदूषण व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर कारवाई न करता ठोस कारवाई करून त्यामध्ये सातत्य ठेवावे. - सुधीर दळवी (सामाजिक कार्यकर्ते)
वाघोली-भावडी सिमेट रस्त्यावर पडलेले खड्डे
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करतना डम्पर