पैशांसाठी मालकानेच केला चोरीचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:35 AM2019-03-03T00:35:37+5:302019-03-03T00:35:40+5:30

गाडीच्या विम्याची १८ लाख रुपयांची रक्कम मिळावी, या हव्यासाने गाडीमालकांनी मोटार गाडी चोरी झाल्याचा बनाव केला.

The owner made the stolen theft | पैशांसाठी मालकानेच केला चोरीचा बनाव

पैशांसाठी मालकानेच केला चोरीचा बनाव

Next

हडपसर : गाडीच्या विम्याची १८ लाख रुपयांची रक्कम मिळावी, या हव्यासाने गाडीमालकांनी मोटार गाडी चोरी झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी त्याचा बनाव उघडा पाडला आहे.
हडपसर पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस नाईक विनोद शिवले यांना गस्तीदरम्यान एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की काही दिवसांपूर्वी हडपसर भागातून एक मोटार गाडी (एमएच १२ पीक्यू २९७५) चोरीस गेली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यातील गाडी ही चोरीस गेली नसून ती फिर्यादीने विम्याच्या पैशासाठी गाडी मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सीमेलगत एका गावामध्ये लपवून ठेवली होती. ती गाडी हडपसर मांजरी भागात फिरत असून त्या गाडीची नंबरप्लेट लावलेली नाही. बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक भांगे यांचे गस्ती पथक फिरत असताना सोलापूर महामार्गावर मांजरी फाटा येथे ही गाडी उभी असल्याची दिसली. गाडीबद्दल संशय असल्याने लगेच पोलिसांनी गाडीतील चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव किरण दत्तात्रेय जाधव (वय २४, रा. पापडेवस्ती, मूळ रा. खामकरवाडी, उस्मानाबाद, बार्शी ) असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे गाडीची नंबरप्लेट, गाडीच्या कागदपत्रांबाबत चौकशी करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला हडपसर पोलीस ठाण्यते आणून अधिक चौकशी केली.
ही गाडीही मध्य प्रदेश येथील एकास विकण्याचे ठरले होते. परंतु इन्शुरन्स कंपनीला आवश्यक असणारा पोलिसांचा अंतिम अहवाल प्राप्त न झाल्याने गाडीचा व्यवहार होऊ शकला नाही. त्याकरिता हडपसरमध्ये आलो होतो, असे जाधव यांनी सांगितले. पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी गाडी चोरीस गेल्याची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने फिर्यादीकडून या गुन्ह्याकामी गाडी जप्त करून खोटी तक्रार दिल्याबाबत लष्कर न्यायालयात खटला दाखल केला आहे.
>किरण जाधव याने सांगितले, की गाडी व्यवसायाकरिता विकत घेतली होती. परंतु फायनान्स हप्ते भरणे शक्य नसल्याने त्याने त्याची गाडी चोरी केल्याचा बनाव करून एक इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीकडून गाडीचे पैसे घ्यायचे व गाडी मध्य प्रदेशमध्ये विकून त्याचेसुद्धा पैसे घ्यायचे, असा बनाव रचला होता.
बनावानुसार फिर्यादीने मागील वर्षी २५ सप्टेंबरला गाडी
चोरीस गेल्याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही गाडीही प्रथम अहमदनगर, (शिरपूर, जि. धुळे) या ठिकाणी लपवून ठेवली.

Web Title: The owner made the stolen theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.