मालकावर चाकूने वार करणाऱ्याचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:00+5:302021-09-16T04:16:00+5:30
पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर चाकूने वार केल्याप्रकरणी उमेश किसन फसले (वय २३, रा. औंध) याचा ...
पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर चाकूने वार केल्याप्रकरणी उमेश किसन फसले (वय २३, रा. औंध) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
याबाबत सागर महादेव थिटे (वय ३०, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. २६ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास औंध परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्यांना त्याने जामिनासाठी अर्ज केला. त्यास सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून, ते रुग्णालयात दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, त्याच्याकडून या स्वरुपाचा गुन्हा पुन्हा घडू शकतो. फिर्यादींच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी ॲड. मुरळीकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
-----------------------------------------