रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:27+5:302021-05-28T04:09:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा प्रशासनाने सर्व खासगी आणि सरकारी हाॅस्पिटल्सचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर ...

Oxygen audit of hospitals started | रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे काम सुरू

रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे काम सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्हा प्रशासनाने सर्व खासगी आणि सरकारी हाॅस्पिटल्सचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर खेड प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पुढाकार घेत आपल्या तालुक्यातील सर्व खासगी आणि सरकारी हाॅस्पिटल्सचे बजाज कंपनीकडून मोफत ऑक्सिजन ऑडिट करून घेतले. तालुक्यातील ४५ हाॅस्पिटल्सचे ऑडिटमध्ये अनेक ठिकाणी गळती आढळून आली. या सर्व खासगी आणि सरकारी हाॅस्पिटल्सची गळतीदेखील बजाज कंपनीने मोफत काढून दिली. यामुळेच एकट्या खेड तालुक्यात दिवसाला १८० गॅस सिलिंडरची बचत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे प्रशासनाला एक-एक टन ऑक्सिजन मिळविण्यासाठी सेकंदासेकंदाला प्रयत्न आणि नियोजन करावे लागले. यामुळे शासनाने शंभर टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठीच राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर देखील ऑक्सिजनचा तुटवडा कमी झाला नाही. यामुळे पुण्यासाठी दुस-या राज्यांतून ऑक्सिजन आणावा लागत आहे. हे सर्व सुरू असतानाच मिळणा-या ऑक्सिजनचा अत्यंत काटकसर करून वापर करण्यावर अधिक भर देण्यात आला. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सर्व खासगी व सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन ऑडिट सुरू केले. तसेच खासगी कंपन्यांकडून देखील ऑक्सिजन ऑडिट करून घेण्यात आले. यामध्ये खेड तालुक्यात बजाज कंपनीकडून सर्व हाॅस्पिटल्सचे ऑडिट करण्यास आले. आता खेड नंतर आंबेगाव, जुन्नर आणि बारामती तालुक्यातील हाॅस्पिटल्सचे बजाज कंपनीकडून ऑक्सिजन ऑडिट करण्यात येणार आहे.

--------

ऑक्सिजन ऑडिटमुळे मोठी बचत

खेड तालुक्यातील सर्व खासगी आणि सरकारी हाॅस्पिटल्सचे बजाज कंपनीच्या सहकार्याने मोफत ऑक्सिजन ऑडिट करून घेण्यात आले. त्यानंतर या ऑक्सिजन ऑडिटमध्ये सापडलेल्या त्रुटीदेखील बजाज कंपनीने स्वखर्चाना दूर करण्यात आल्या. यामुळेच एकट्या खेड तालुक्यात दिवसाला सुमारे १८० गॅस सिलिंडरची बचत झाली. आता बजाज कंपनीच अन्य तालुक्यात देखील ऑक्सिजन ऑडिट करून देणार आहे.

- विक्रांत चव्हाण, खेड प्रांत अधिकारी

Web Title: Oxygen audit of hospitals started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.