नारयाणगाव ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:06+5:302021-05-31T04:09:06+5:30
नारायणगाव : रोटरी क्लब नारायणगाव हायवे, रोटरी क्लब गांधी भवन पुणे व डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव यांच्या ...
नारायणगाव : रोटरी क्लब नारायणगाव हायवे, रोटरी क्लब गांधी भवन पुणे व डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि पीपीई किट व मास्क भेट देण्यात आल्याची माहिती रोटरीचे मेडिकल डिस्ट्रिक झोनल डायरेक्टर डॉ. पंजाबराव कथे यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ऑक्सिजनची गरज असल्याने या कॉन्सन्ट्रेटर यंत्राचा उपयोग होणार आहे. यापुढील काळात समाजासाठी सेवाभाव जोपासून सर्वांच्या मदतीने कोविडसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास आमदार अतुल बेनके यांच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, डॉ. पिंकी कथे, रोटरी क्लब गांधीभवनचे शशांक टिळक, गिरीश मटकर, राहुल बाळ, मीनल धोत्रे, विद्या बाळ, अश्विनी शिलेदार, राम भालेराव, शिवाजी टाकळकर, सुकाजी मुळे, शामराव थोरात, रवींद्र वाजगे, सचिन घोडेकर, नंदकुमार चिंचकर, रामभाऊ सातपुते, नारायण आरोटे, डॉ. अभिजित काळे व रुग्णालयाचा सर्व मेडिकल स्टाफ उपस्थित होता.
रोटरी क्लब नारायणगाव हायवे व रोटरी क्लब गांधी भवन व डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून पुढील भविष्यकाळात आपण असेच योगदान द्याल, अशी अपेक्षा बेनके यांनी व्यक्त केली.
यावेळी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन, रोटरी क्लब गांधी भवनचे अध्यक्ष शशांक सप्रे व शिवनेरी भूषण डॉ. सदानंद राऊत यांनीही रोटरी क्लबने राबविलेल्या उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीकांत फुलसुंदर यांनी तर डॉ. योगेश आगम यांनी आभार मानले.