सीएएसआर फंडातून रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:16+5:302021-05-01T04:10:16+5:30

---- उरुळी कांचन : कोरोना संसर्गाच्या महामारी पासून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी सरकार व जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत ...

Oxygen concentrators to hospitals from the CASR fund | सीएएसआर फंडातून रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

सीएएसआर फंडातून रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

Next

----

उरुळी कांचन : कोरोना संसर्गाच्या महामारी पासून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी सरकार व जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून त्याचाच एक भाग म्हणून आज उरुळी कांचन व लोणी परिसरातील दोन खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट देण्यात येत आहेत, याचा वापर या रुग्णालयांनी गोरगरीब जनतेसाठी करून मदत करावी अशी भावना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या सी.एस.आर फंडातून सध्या कमतरता भासत असलेल्या ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन तो रुग्णाला पाच लिटर ताशी क्षमतेनेे पुरवठा करता येणारे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळवण्यात आले असून त्याचे वितरण जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांना करण्यात येणार आहे. आज उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलला आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरणती करण्यात आले. त्यातील एक लोणी कोळभोर येथील सुयश हॉस्पीटलमध्ये देण्यात आले.

यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, शिरूरचे उपविभागीय अधिकारी सुभाषकुमार देशमुख, हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, उरुळी कांचनचे तलाठी प्रदीप जवळकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद थेऊरकर व डॉ. गणेश ताठे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन कांचन आदी उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : ३०उरुळी कांचन रुग्णालय

उरुळी कांचन येथील रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देताना आमदार अशोक पवार व रुग्णालयातील डॉक्टस प्रशासन

Web Title: Oxygen concentrators to hospitals from the CASR fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.