अवघ्या दोन आठवड्यांत साकारला 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:39+5:302021-05-07T04:10:39+5:30

ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. सिंहगड रस्त्यावरील वडगांव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात एकूण ५० ...

'Oxygen generating plant' in just two weeks | अवघ्या दोन आठवड्यांत साकारला 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट'

अवघ्या दोन आठवड्यांत साकारला 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट'

Next

ऑक्सिजन मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. सिंहगड रस्त्यावरील वडगांव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात एकूण ५० ऑक्सिजन बेड्स आहेत. सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी असल्याने ३० ऑक्सिजन बेड्स सुरू आहेत. सध्या किलो प्रतिदिन एक ते दीड यूरा सिलिंडरप्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झालेली असल्याने ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्टसारखी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाल्याने अवघ्या दोन आठवड्यांत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात आला आहे.

लायगुडे रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट असणे आवश्यक होते. त्यानुसार २६० लिटर/मिनिटप्रमाणे ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट्स बसविला आहे. तसेच बॅकपसाठी एक अतिरिक्त कॉम्प्रेसर, सिस्टीमपर्यंतचे पाईपिंग, विद्युतविषयक कामे या सर्व बाबी करून घेण्यात आल्या आहेत. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना याबाबत मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी लायगुडे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सनातन व औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप यांनी विशेष प्रयत्न केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सीएसआर फंडातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

चौकट:

वातावरणातील हवेतून होतेय ऑक्सिजननिर्मिती...

पुणे शहरातील महापालिकेचा हा पहिला प्रकल्प आहे. दोन हजार लिटर ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता ह्या प्रकल्पात आहे. हवेतील वातावरणातून हवा घेऊन हवेतील अन्य घटक वेगळे करून ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. यामुळे लायगुडे रुग्णालय ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे.

फोटो ओळ: वडगाव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात 'ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट' बसविण्यात आला आहे.

Web Title: 'Oxygen generating plant' in just two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.