कोविड सेंटरला ऑक्सिजन मशीन व वॉशिंग मशीन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:55+5:302021-04-29T04:07:55+5:30
विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांचे मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांना उपचार मिळावेत या उद्देशाने शिरोली बु. येथे प्राथमिक आरोग्य ...
विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांचे मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांना उपचार मिळावेत या उद्देशाने शिरोली बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ बेडचे अद्ययावत असे ऑक्सिजन सुविधा असलेले कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी कोविड रुग्णांना मोफत औषध, उपचार व जेवण दिला जाते. प्रशिक्षित डॉक्टरांचा स्टाफ व कर्मचारी, नर्स तेथे काम करत आहेत. या सामाजिक कामासाठी चेअरमन शेरकर यांच्या प्रेरणेने गावातील शाळेच्या १९९० च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी गावच्या सामाजिक कार्याचा वसा जपत चंद्रकांत पटवा, दत्तात्रेय बोऱ्हाडे (लियर प्रोडक्शन मॅनेजर), दत्तात्रय शिंदे, शरद शिंदे, विकास मोरे, अनिता थोरवे, सुजाता विधाटे, माधुरी पाखरे आदी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाच्या माध्यमातून एकत्रित येऊन कोविड केअर सेंटरला इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशीन व नवीन वॉशिंग मशीन भेट दिली.
भविष्यात देखील सर्व माजी विध्यार्थी गरजेनुसार कोविड सेंटरला सहकार्य करणार असल्याचे चंद्रकांत पटवा, दत्तात्रेय बोऱ्हाडे यांनी सांगितले.
फोटो- शिरोली बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरला न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक शाळेतील माजी विद्यार्थ्यानी ऑक्सिजन मशीन व वॉशिंग मशीन भेट दिली. या वेळी सत्यशील शेरकर व माजी विद्यार्थी.