वाघोलीत उभारणार ऑक्सिजन प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:41+5:302021-05-31T04:08:41+5:30
आव्हाळवाडी : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा ...
आव्हाळवाडी : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी वाघोली ग्रामपंचायत लवकरच ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. नुकत्याच झालेल्या मासिक मीटिंगमध्ये ऑक्सिजन उभारण्यासंदर्भात कार्यकारी मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतला असल्याची माहिती संदीप सातव यांनी दिली आहे.
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व शासकीय परवानगी घेऊन लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असणार आहे. भविष्यातील कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता ऑक्सिजन प्लांटची गरज असल्याने ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये कोविड सेंटर व ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी केल्यानंतर सर्व कार्यकारी मंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे ग्रामपंचायत संदीप सातव यांनी सांगितले.
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वाघोली ग्रामपंचायतकडून ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच कोविड शासकीय परवानगी मिळाल्यानंतर प्लांट उभारणीला सुरुवात होईल. - संदीप सातव (ग्रामपंचायत सदस्य, वाघोली)