जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:10 AM2021-06-25T04:10:01+5:302021-06-25T04:10:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालय व्यवस्थापनाबरोबर प्रशासनाचीही धावपळ ...

The oxygen production capacity of the district will be increased | जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढणार

जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालय व्यवस्थापनाबरोबर प्रशासनाचीही धावपळ झाली होती. यामुळे ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून १०, तर सामाजिक संस्था आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून २३ असे ३३ ऑक्सिजन निर्मिती केंद्र जिल्ह्यात रुग्णालयात, तसेच तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असून, यातील ८ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. बाकी प्रकल्प येत्या दीड महिन्यात कार्यान्वित करण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे. दिवसाला १५ हजार लिटर परमिनीट ऑक्सिजनची निर्मिती या केंद्रातून होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात जाणवली. ही कमतरता दूर करण्यासाठी कारखान्यांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून तो रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण होत नव्हती. यामुळे बाहेरून राज्यातून ऑक्सिजन कंटेनर, तसेच टँकरच्या माध्यमातून आणून त्याचा पुरवठा रुग्णालयांना केला जात होता. यातही विलंब होत असल्याने कमी-अधिक क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी देऊन १० प्रकल्प तालुका स्तरावर कार्यान्वित करण्यात आले. तर सामाजिक संस्था आणि खासगी कारखान्यांनी सामाजिक दायित्व निधीतून अनेक रुग्णालयात छोट्या-मोठ्या ऑक्सिजन निर्मितीच्या क्षमतेचे प्रकल्प जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यासाठी मदत केली होती. महिनाभरापूर्वी हे प्रकल्प उभारण्याचे काम तेरा तालुक्यांतील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात सुरू झाले आहे. यातील ८ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या रुग्णांची संख्या कमी झाली असून ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे.

सध्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर खाटा तसेच साध्या खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या दृष्टिकोनातूनही अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्यात आले आहे. या नव्या प्रकल्पामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरताही दूर होणार आहे. या प्रकल्पातून दुसऱ्या रुग्णालयांनाही ऑक्सिजन पुरविता येणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे प्रकल्पाचा पाया उभारला जाणार आहे. तर ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारी महत्त्वाची यंत्रणा सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे.

चौकट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७, बजाज कंपनीच्या माध्यमातून ५, एलजी कंपनीच्या माध्यमातून २, टाटा कंपनीच्या माध्यमातून ३, सीएच कंपनीच्या माध्यमातून ३, बीपीसीएल कंपनीच्या माध्यमातून १, ॲसेंचर कंपनीच्या माध्यमातून १, डायनामिक कंपनीच्या माध्यमातून १, रिलायन्स कंपन्याच्या माध्यमातून २, महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून १, डीआरडीओद्वारे १, विप्रोद्वारे १, प्रिन्सीपल पौर्णिमाद्वारे २, इम्पॅक्ट गुरूद्वारे १,आयटीसी द्वारे १ तर फियाट कंपनीद्वारे १ असे ३३ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

कोट

जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मितीबाबत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, तसेच ऑक्सिजनची निर्मिती वाढवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले. येत्या दीड महिन्यात सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

चौकट

तालुका प्रकल्प उभारण्यात येणारे रुग्णालय ऑक्सिजन निर्मितीची क्षमता (लिटर परमिनीट)

मुळशी विप्रो रुग्णालय २५०

मावळ कान्हे फाटा, वडगाव १५०

खेड चांडोली रुग्णालय १५०

आंबेगाव मंचर रुग्णालय १५९

जुन्नर शिरोली १५०

आंबेगाव जंबो कोविड सेंटर ५००

इंदापूर एसडीएच १५०

जुन्नर ग्रामीण रुग्नालय ५००

मावळ आरएच काले कॉलनी ५००

बारामती आरएच सुपा ५००

पुरंदर आरएच जेजुरी ५००

शिरूर आरएच पाबळ ५००

इंदापूर आरएच भिगवण ५००

शिरूर आरएच शिक्रापूर ३००

मुळशी आरएच पौड ३००

शिरुर आरएच न्हावरे ५००

भोर एसडीएच भोर ५००

दौंड ट्रॉमा केअर यवत ५००

खेड आरएच चाकण ५००

आंबेगाव आरएच घोडेगाव ७५

शिरूर अरएच मलठण ४५०

बारामती महिला रुग्नालय २२५

बारामती आरएच रूई ५००

इंदापूर आरएच बावडा ५००

इंदापूर ग्रामीण रुग्णालय निमगाव ५००

जुन्नर आरएच जुन्नर ५००

पुरंदर आरएच सासवड ५००

शिरूर आरएच शिरूर ५००

वेल्हा आरएच वेल्हा ५००

दौंड सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ५००

खेड आरएच आळंदी ५००

पुणे अोंध जिल्हा रुग्णालय १०००

Web Title: The oxygen production capacity of the district will be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.