औद्योगिक वापरासाठीचा राखीव ऑक्सिजन साठा वैद्यकीय उपचारासाठी : डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:33+5:302021-04-22T04:09:33+5:30

तरीही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून तातडीने ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांशी संपर्क साधून औंध येथील जिल्हा निर्मिती प्रकल्प ...

Oxygen reserves reserved for industrial use for medical treatment: Dr. Amol Kolhe | औद्योगिक वापरासाठीचा राखीव ऑक्सिजन साठा वैद्यकीय उपचारासाठी : डॉ. अमोल कोल्हे

औद्योगिक वापरासाठीचा राखीव ऑक्सिजन साठा वैद्यकीय उपचारासाठी : डॉ. अमोल कोल्हे

googlenewsNext

तरीही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून तातडीने ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांशी संपर्क साधून औंध

येथील जिल्हा निर्मिती प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीएसआर निधीतून औद्योगिक क्षेत्रातच प्रकल्प सुरू

करता येईल का, याची चाचपणी जिल्हा प्रशासनाकडून सुरू असून उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात सीएसआर

निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार

डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

दरम्यान , एखाद्या रुग्णालयाला स्वतःसाठी ऑक्सिजन प्लांट उभारायचा असेल तर असे प्लांट उभारणाऱ्या कंपन्यांशी

समन्वय साधून देण्याची तयारी खा. डॉ . कोल्हे यांनी आरोग्य अधिकारी व डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

साधताना दर्शवली .

कोरोना प्रतिबंधक उपचार या विषयावर मुंबईतील केईएम हॉस्पिटल कोविड आयसीयूचे इनचार्ज व नेस्को कोविड सेंटरचे

डीन डॉ. संतोष सलागरे यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर व हवेली तालुक्यांचे आरोग्य अधिकारी, शासकीय व खासगी

रुग्णालयांचे डॉक्टर व पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला . या ऑनलाइन मिटिंगला जुन्नर

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकले, खेड तालुका आरोग्य

अधिकारी डॉ. गाढवे, शिरूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोरे व हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात,

डॉ. अजय पंडित, डॉ. भगवान काकणे, डॉ. इंदिरा पारखे, डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. किरण जाधव, डॉ. भूषण साळी,

डॉ. प्रशांत दौंडकर, डॉ. चेतन कर्डिले यांच्यासह विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर व पत्रकार उपस्थित होते.

ग्रामीण भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर बेडची उपलब्धता व अन्य समस्यांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी डॉ. कोल्हे यांनी डॉक्टरांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. या वेबिनारमध्ये विविध रुग्णालय, डीसीएचसीचे

८५ पेक्षा जास्त डॉक्टर उपस्थित होते.

खा. डॉ कोल्हे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक उपचार करताना ग्रामीण भागात रेमडिसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर

बेडची उपलब्धता व अन्य समस्यांच्या सोडवणुकीसाठी मागणी वाढत आहे. त्यानुसार रेमडिसिवीर, ऑक्सिजन पुरवठा

सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच त्याची पूर्तता होईल, रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. परंतु

पुरवठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उपचार करताना रेमडिसिविर ऐवजी फॅव्हीपॅरावीर या

पर्यायी औषधांचा वापर करावा . अत्यावश्यक असेल तरच रेमडेसिविरचा वापर करावा . प्लाझ्मा थेरेपीच्या राज्य

सरकारच्या क्लिनिकल ट्रायल्स बंद झाल्या आहेत. तरीही काही हॉस्पिटल्स व डॉक्टरांकडून प्लाझ्माचा आग्रह धरला धरतो.

त्यामुळे रेमडेसिविर आणि प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होते. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडच्या

पूर्ततेसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी देखील पाठपुरावा सुरू आहे,

अशी माहिती खा . डॉ . कोल्हे यांनी दिली .

Web Title: Oxygen reserves reserved for industrial use for medical treatment: Dr. Amol Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.