पूर्व हवेलीत धावताहेत ऑक्सिजन रिक्षा ॲम्ब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:55+5:302021-05-11T04:11:55+5:30
-- पंढरीनाथ नामगुडे : कदमवाकवस्ती : गेल्या एकवर्षाहून जास्त काळ भारतात आणि जगभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. या ...
--
पंढरीनाथ नामगुडे : कदमवाकवस्ती : गेल्या एकवर्षाहून जास्त काळ भारतात आणि जगभरात कोरोना ठाण मांडून बसला आहे. या काळात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जशा घटना घडल्या, तशाच माणुसकीवरचा विश्वास अजून बळकट करणारे देवदूतही! याचेच एक उदाहरण म्हणजे, पूर्व हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या परिसरात ‘बघतोय रिक्षावाला फोरम’च्या रिक्षा ऑक्सिजनची सुविधा देणाऱ्या ॲब्युलन्सची भूमिका पार पडताहेत.
सध्या पूर्व हवेलीत कोरोना रुग्नाला बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही आणि यावेळी रुग्णांना बेड शोधण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे. हे करताना रुग्णाची ऑक्सिजनची पातळी खालावली तर त्यामध्ये त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे म्हणून ‘बघतोय रिक्षावाला फोरम’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर व उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या परिसरात ‘बघतोय रिक्षावाला फोरम’चा एक जुगाड ॲम्ब्युलन्स हा उपक्रम राबवला जात आहे.
ऑक्सिजन सिलिंडर लावून रिक्षा ॲम्ब्युलन्स सेवा पुरवायला चालू केले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत या विचारातून हे काम सुरू केले आहे.
या फोरमचा ९६५७२८९४११ हा एक हेल्पलाईन नंबर असून गरजू रुग्णांना या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यावर २० ते २५ मिनिटांत सेवा उपलब्ध होईल अशी माहिती संतोष नेवासकर यांनी दिली. सध्या तीन रिक्षा सुरू असून अजून दहा रिक्षा पूर्व हवेलीत धावणार असल्याची माहिती या वेळी दिली.
या रिक्षा चालवण्यासाठी परिसरातील मायकल शिरसाठ, सचिन वैराट, सोमनाथ म्हस्के, संतोष नेवासकर, आशिष ओपळकर, आलताफ शेख, आप्पा हिरेमठ, दीपक अहिरे,प्रकाश घाडगे,मेमन युसूफ,शाहबाज पटेल,अमोल चौगुले,मंगेश अडागळे हे धाडसी चालक कुठल्याही पैशाची आशा न बाळगता गोरगरीब-गरजू रुग्णांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देत आहेत.