टाकळी हाजी आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिजन संच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:54+5:302021-05-18T04:11:54+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण, आरोग्यसेवक डॉ. भरत सोदक यांच्याकडे हे उपकरण सुपूर्त करण्यात आले, त्या वेळी ...

Oxygen set gift for Takli Haji Health Center | टाकळी हाजी आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिजन संच भेट

टाकळी हाजी आरोग्य केंद्रासाठी ऑक्सिजन संच भेट

googlenewsNext

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण, आरोग्यसेवक डॉ. भरत सोदक यांच्याकडे हे उपकरण सुपूर्त करण्यात आले, त्या वेळी सेवानिवृत्त प्राचार्य संभाजी खोमणे, कोंढवा येथील सिटीकेअर हॉस्पिटलचे सुनील उचाळे, पुणे शहर पोलीस दत्तात्रय गावडे, पुणे मनपा आदर्श शिक्षक सोमनाथ उचाळे, संभाजी साबळे, दगडू निचीत व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टाकळी हाजी रूग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत, तेथे ऑक्सिजनअभावी २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी रुग्णांना ऑक्सिजन संचाची नितांत गरज ओळखून पुणेकर मंडळींनी एकत्र येत लोकवर्गणीतून ही उपकरणे भेट दिली. कोरोना रुग्णांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमासाठी कांदा व्यापारी निवृत्तीशेठ बेल्हेकर, वन अधिकारी संतोष चव्हाण, स्वप्निल बेल्हेकर ,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबाजी गावडे, पोलीस उपनिरीक्षक विद्या साळवे, किशोरी साबळे, पुणे मनपा प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे, वैद्यकीय अधिकारी विकास घोडे, कॅप्टन सुशांत घोडे, झुंबरशेठ उचाळे, आदर्श शिक्षक रामदास मेचे, शिवाजी गावडे, उद्योजक रमेश गुगळे, अरूण सोदक, शरद सोदक, किशोर साबळे नवनाथ औटी, रेश्मा वायसे, दिनकर साबळे, गणेश गाडगे, लक्ष्मण बबन उचाळे, शहाजी पवार या पुणेकर मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सोमनाथ उचाळे यांनी केले. आभार रभाजी खोमणे यांनी मानले.

--

फोटो क्रमांक : १७ टाकळी हाजी

फोटो : प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ चव्हाण यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर भेट देताना आम्ही पुणेकर ग्रुपचे सदस्य

Web Title: Oxygen set gift for Takli Haji Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.